रायगड भाजपा सांस्कृतिक सेलतर्फे ‘बिग बॉस १९’ तृतीय विजेता व सुप्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरेची भेट



4kNews दि. 10
पनवेल (प्रतिनिधी) रायगड भाजपा सांस्कृतिक सेलच्या पदाधिकाऱ्यांनी हिंदी बिग बॉस सिझन १९ मध्ये तृतीय क्रमांक पटकावणारे आणि पनवेल–खारघरचा गौरव वाढविणारे सुप्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे यांची सदिच्छा भेट घेतली. 



या भेटीदरम्यान सेलच्या वतीने प्रणित मोरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. बिग बॉसच्या व्यासपीठावर आपल्या दमदार व्यक्तिमत्वाने आणि विनोद शैलीने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या मोरे यांच्याशी विविध विषयांवर चर्चाही झाली.
या प्रसंगी रायगड भाजपा सांस्कृतिक सेलचे अभिषेक पटवर्धन, गणेश जगताप, चिन्मय समेळ, निखिल गोरे, कौस्तुभ सोमण आणि गोविंद राजपुरोहित उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top