नवीन बातम्या
रोटरी क्लब ऑफ पनवेलतर्फे प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना ‘व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड’ प्रदान होणार
पनवेलमध्ये ‘महारोजगार मेळावा २०२६’ला हजारोंचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांनी घेतला लाभ
उरण महाविद्यालयात जपानी भाषा  प्रशिक्षणाची सुरुवात.
महाराष्ट्रातील २७+६ ओबीसी जातींच्या केंद्राच्या यादीतील समावेशासाठी दिल्लीत जोरदार पाठपुरावा. महाराष्ट्र ओबीसी कृती समिती व पवार मिशनचा तीन दिवसीय दौरा यशस्वी.
कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वात मे. अमेया कंपनीतील कामगारांना ७२०० रुपये पगारवाढ. न्यु मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेचा या वर्षातील ९ वा पगारवाढीचा करार.
उरणमध्ये राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाची पर्वणी;
द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे २६ वे राज्यस्तरीय वर्षा मॅरेथॉन व फुटबॉल स्पर्धेचे भव्य आयोजन.
गुरु-शिष्य परंपरेचा जागर; विचुंबे येथे गुरुपौर्णिमा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न
टेलिग्राम ट्रेडिंगच्या आमिषाने १९.९० लाखांची फसवणूक; मध्य प्रदेशातील आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी घेतले ताब्यात
रायगड भूषण जितेंद्र अनंतकुमार म्हात्रे यांचा ‘माऊली’ सन्मानाने विशेष गौरव
सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल; मान्यवरांच्या उपस्थितीत झाला गौरव सोहळा

गुरु-शिष्य परंपरेचा जागर; विचुंबे येथे गुरुपौर्णिमा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

4kNews कामोठे दि. 8
नवीन पनवेल, प्रतिनिधी :
विचुंबे गाव येथे २ ऑगस्ट २०२६ रोजी श्री लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ आणि श्री कृष्णा काडवे बुवा शिष्यगण यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमा सोहळा उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. 


सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य बुवा श्री. कृष्णा पांडुरंग काडवे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या सोहळ्याची सुरुवात विचुंबे गावचे माजी उपसरपंच श्री. रवींद्रजी (भाई) भोईर यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी माजी सभापती सौ. प्रणालीताई भोईर, ग्रामपंचायत सदस्या सौ. धनश्रीताई भोईर, ग्रामपंचायत सदस्य श्री. आप्पा गायकवाड, श्री. संजय भोईर, श्री. किशोर सुरते तसेच श्री. अविनाश गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. रेल्वे प्रवासी भजन मंडळाचे बुवा श्री. रमेश यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. 


या प्रसंगी सुप्रसिद्ध भजनकार श्री. सुशील गोठणकर माऊली यांनी आपल्या सहपरिवार व शिष्यपरिवारासह उपस्थित राहून सुरेल भजनांची सेवा सादर केली. तसेच श्री. आदेश खंडागळे, सुप्रसिद्ध झांजवादक श्री. कमलेश सुतार, श्री. सुशील लाड, बंधुराज प्रदीप भरत काडवे, उत्कृष्ट छायाचित्रकार साईदीप पारकर तसेच इतर कलाकारांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.


बाल व युवा कलाकार वेदांत काडवे, सुजल काडवे आणि शुभम संकपाळ यांनी उत्कृष्ट पखवाज व तालसाथ करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी शिष्यमंडळींनी गुरुवर्य श्री. कृष्णा काडवे बुवांचे अत्यंत भक्तिभावाने गुरुपूजन केले. त्यानंतर सादर करण्यात आलेल्या भजनांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. अखेरीस श्री. कृष्णा काडवे बुवांनी गायलेल्या मधुर भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली.


हा सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळाचे सर्व सभासद, काडवे बुवा शिष्य परिवारातील सदस्य तसेच विचुंबे ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले. भक्ती, श्रद्धा आणि गुरु-शिष्य परंपरेचे जतन करत पार पडलेला हा गुरुपौर्णिमा सोहळा उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top