पावसाळीपूर्वीची कामे लवकरात लवकर करण्यात यावे; नगरसेवक ऍडव्होकेट मनोज भुजबळ यांची आयुक्तांना निवेदन

4kNews कामोठे
पनवेल दि.23 (वार्ताहर):  पावसाळीपूर्वीची कामे लवकरात लवकर करण्यात यावे अशी मागणी नगरसेवक ऍडव्होकेट मनोज भुजबळ यांनी आयुक्तांना निवेदन देऊन केली आहे. 


 पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक ॲड मनोज कृष्णाजी भुजबळ यांनी पनवेल महानगरपालिका आयुक्त यांना निवेदनाद्वारे पावसाळ्यापूर्वी करण्याची कामे आपले पत्र देऊन मागणी केली आहे;. यामध्ये त्यांनी अय्यप्पा मंदिर ते देवद कडे जाणाऱ्या नवीन रस्त्यावर स्ट्रीट लाईट बसवावे, नवीन पनवेल प्रभाग 17 येथील उंच वाढलेल्या झाडांची पावसाळ्यापूर्वी छाटणी करावी, नवीन पनवेल येथील सेक्टर 12 18 19 मधील हरित पट्ट्यातील गार्डन मधील पथवे दुरुस्ती , संरक्षण भिंतीची दुरुस्ती व झाडांची छाटणी करावी तसेच पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सेक्टर 12 ते 19 मध्ये असलेल्या उद्यानांमध्ये डेकोरेटिव्ह लाईटचे पोल बसविण्याची मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top