भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी दिली युवा मोर्चाचे पनवेल शहर सरचिटणीस अनिमेष ओझे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

4kNews कामोठे
पनवेल, दि.23 (वार्ताहर) ः भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा प्रदेश दौरा सुरू आहे. त्यांच्या उपस्थितीत काल आणि आज उत्तर रायगड जिल्हा युवा मोर्चाच्या वतीने अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले. आज सकाळी त्यांनी युवा मोर्चाचे पनवेल शहर सरचिटणीस अनिमेष ओझे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.


त्यावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महापौर नितीन पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, विश्‍वजीत पाटील, भाजपा पनवेल अध्यक्ष सुमित झुंजारराव, सरचिटणीस अमित ओझे,रुपेश नागवेकर, उपाध्यक्ष केदार भगत, प्रीतम म्हात्रे, प्रशांत शेटे, युवा मोर्चा शहराध्यक्ष हिमेश बहिरा, नगरसेविका शिवानी घरत, अस्मिता घरत यांच्या सह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top