नवीन बातम्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नविन पनवेल भाजप मंडलाचे रक्तदान शिबिर उत्साहात
Open Channels FM: Our Guide to Open Channels FM Podcast Network’s Channels, Series, and Blog
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी देवेंद्र गंगाराम मढवी यांची  बिनविरोध निवड.
हिंदू देवी-देवतांचा अवमान केल्याचा कांबळे कुटुंबावरील आरोप खोटा; तळोजा वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांचे स्पष्टीकरण
शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा; कर्जमाफीमुळे बळीराजाला मोठा दिलासा – नामदार ॲड. आशिष शेलार
रायगड जिल्हा किसान मोर्चातर्फे पनवेलमध्ये ‘कृतज्ञता मेळावा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार
सन्माननीय रिपाइं नेते नरेंद्र गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जुलै २०२६ संपूर्ण महिनाभर विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले
लोकप्रतिनिधींच्या पत्रांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
नगरसेवक प्रथमेश सोमण प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर बरसले!
फिजिबिलिटी अहवालासाठी 50 हजारांची लाच; महावितरणचा सहायक अभियंता एसीबीच्या जाळ्यात
पनवेल महानगरपालिकेच्या निष्काळजी आणि बेजबाबदार कारभाराचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केला संताप व्यक्त

सायबर जागरूकतेसह हळदी-कुंकू समारंभः कमळ महिला पतसंस्थाः परंपरा आणि जागरूकतेचा सुंदर संगम

4kNews कामोठे

पनवेल, दि.23 (वार्ताहर) ः कमळ महिला नागरी सहकारी पतसंस्था (म.) पनवेल ही संस्था महिलांसाठी नेहमीच विविध उपक्रम राबवित असते. यावर्षीही चैत्रगौरी निमित्त हळदी-कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम पतसंस्थेच्या कर्मचारी प्रशिक्षण केंद्र, पहिला मजला, जयभारत नाका, पनवेल येथे पार पडला.
समारंभाच्या सुरुवातीला संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. पूर्वा खेडेकर यांनी उपस्थित महिला सभासदांचे स्वागत केले. 

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून दक्षता समिती सदस्य तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक सौ. सारिका मॅडम आणि सहाय्यक पोलीस श्री. सचिन पोवार सर उपस्थित होते. संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. पूर्वा खेडेकर यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून संस्थेच्या आर्थिक स्थितीची सविस्तर माहिती दिली. व विविध उपक्रमांची माहिती दिली तसेच चैत्रगौरी हळदी-कुंकू समारंभाची महती याबाबत महिलांना मार्गदर्शन केले व महत्त्व स्पष्ट केले. त्यानंतर प्रमुख पाहुणे सो सारिका मॅडम व श्री सचिन पोवार सर यांनी उपस्थित महिलां संभासदाना सायबर गुन्हे आणि सध्याच्या परिस्थितीबाबत मार्गदर्शन केले. आणि त्यांनी केलेले मार्गदर्शन सर्व महिलांना खरोखरच मोलाचे ठरले. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ उपस्थित महिलांना झाला.  

कार्यक्रमात महिलांसाठी मनोरंजनपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांना महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाः त्यानंतर सर्व उपस्थित महिला सभासदांना हळदी-कुंकू वाण दिले. यावेळी चांगल्या प्रकारे महिला सभासदांनी उपस्थिती दर्शवली. या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती मालती आंग्रे, उपाध्यक्षा सौ. पूर्वा खेडेकर, संचालिका श्रीमती चित्रा मानकामे, सौ. मनीषा विसपुते, सौ. सुषमा जांभळे, सौ. निर्मला म्हात्रे, सौ. अर्चना गायकवाड तसेच संस्थेच्या महिला कर्मचार्‍यांनी उत्साहाने सहभाग घेतला. संस्थेचे संस्थापक तथा तज्ञ संचालक शशिकांत बांदोडकर यांच्या मार्गदर्शनामुळे हा हळदी-कुंकू समारंभ यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रम आनंददायी आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top