मुंबई (प्रतिनिधी): रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आर.पी.आय.) मुंबई प्रदेशचे सरचिटणीस विवेक गोविंदराव पवार यांनी आज सामाजिक ऐक्य आणि विचारांची परंपरा जपत विविध ठिकाणी महापुरुषांना अभिवादन केले.

सकाळी त्यांनी भगवान गौतम बुद्ध विहार येथे भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. या वेळी उपस्थितांना त्यांनी बुद्ध व बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण ठेवून समाजामध्ये बंधुत्व, समानता आणि शांततेचा संदेश देण्याचे आवाहन केले.

यानंतर महात्मा गांधी जयंती निमित्त विवेक पवार यांनी जुहू चौपाटी येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण केली. राष्ट्रपित्याला वंदन करत त्यांनी गांधीजींच्या अहिंसा, सत्य आणि सामाजिक एकतेच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमांमधून विवेक गोविंदराव पवार यांनी महान नेत्यांच्या कार्याचा गौरव करत सामाजिक ऐक्य आणि प्रबोधनाचा संदेश दिला.
