नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

जुना शेवा कोळीवाडा (हनुमान कोळीवाडा )चे पुनर्वसनासाठी जागा देण्यासाठी केंद्र सरकारचे राज्य सरकारला निर्देश.






4k समाचार

उरण दि 4 (विठ्ठल ममताबादे )
शेवा कोळीवाडा सामाजिक ग्रामविकास मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी २ ऑक्टोंबर २०२५ रोजी जेएनपीटी (जेएनपीए )लगत असलेल्या समुद्रातील जहाज बोटीचे मार्ग बंद करून बेमुदत चॅनेल बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच गेली ४० वर्षे पुनर्वसन न झाल्याने व जेएनपीटी प्रशासनाने ग्रामस्थांना विविध सेवा सुविधा पासून वंचित ठेवल्याने मुंबई उच्च न्यायालयात ८६५५ ऑफ २०२५ नुसार जनहित याचिका सुद्धा दाखल करण्यात आली होती.दि.०४/०९/२०२५ रोजीच्या आदेशात डिसेंबर २०२५ पर्यंत केंद्र शासन शेवा कोळीवाडा गावाच्या पुनर्वसनाचा योग्य निर्णय देईल आणि त्यानंतर शेवा कोळीवाडा गावाचे पुनर्वसन करणार असल्याचे केंद्र शासनाचे  वकिल डी. पी. सिंह यांनी उच्च न्यायालय मुंबई यांना सांगितले. उच्च न्यायालय मुंबई यांनी वकिल डी. पी. सिंह यांना दिनांक २२ डिसेंबर २०२५ पर्यंत त्यांचे म्हणणे कोर्टाला प्रतिज्ञापत्रात सादर करण्याचा आदेश दिलेला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर केंद्र सरकार कडून दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी शेवा कोळीवाडा गावाच्या पुनर्वसनासाठी मंजूर केलेली जेएनपीटी टाउनशीपला लागून असलेली जमीन केंद्र शासनाने मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांना हस्तांतर केलेली आहे. 


      जेएनपीटी प्रशासनाने जुना शेवा कोळीवाडा (हनुमान कोळीवाडा )ग्रामस्थांना त्यांच्या सेवा सवलती मिळवून देण्यासाठी व पुनर्वसनासाठी हालचाली सुरू केले आहेत. जेएनपीटी प्रशासन व शेवा कोळीवाडा ग्रामस्थ यांच्यामध्ये दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी जेएनपीटी प्रशासन भवन येथे  एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली. यात केंद्र सरकार व जेएनपीटी प्रशासनातर्फे जुना शेवा कोळीवाडा (हनुमान कोळीवाडा ) ग्रामस्थांचे नवीन गावठणात  शासनाच्या मापदंडाने पुनर्वसनाचे प्रश्न, शासनाच्या मापदंडाने नागरी सेवा सुविधाचे प्रश्न लवकरच सोडविण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष जेएनपीए यांनी हनुमान कोळीवाडा (जुना शेवा कोळीवाडा )ग्रामस्थांना दिली. आणि सदर बैठकीत ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा कायमची बंद करण्याचा विषय ग्रामस्थांनी  उपजिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे मांडल्यानंतर त्यावर योग्य निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे जुना शेवा कोळीवाडा (हनुमान कोळीवाडा) ग्रामस्थांतर्फे आयोजित करण्यात आलेले बेमुदत समुद्र चॅनेल बंद आंदोलन तूर्तास पुढे ढकलले असल्याची  माहिती महाराष्ट्र स्मॉल स्केल ट्रेडिशनल फिश वर्कर्स यूनियनचे जनरल सेक्रेटरी  व पारंपारिक मच्छीमार नेते रमेश कोळी यांनी दिली.


जेएनपीए मध्ये संपन्न झालेल्या बैठकीत जेएनपीए चेअरमन उन्मेष वाघ ,जेएनपीए महाव्यवस्थापक प्रशासन व सचिव मनिषा जाधव ,डेप्युटी कलेक्टर भारत वाघमारे ,तहसीलदार उद्धव कदम ,गटविकास अधिकारी  सर्जेराव पाटील ,एमआयडिसी उरण उपअभियंता सोनवणे ,उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग उरण, उपप्रभंधक जेएनपीए टाउनशिप मुख्यप्रबंधक (मटेरियल ऍण्ड इलेक्ट्रिकल जेएनपीए ),मूख्य महाव्यवस्थापक पी पी ऍण्ड डी जेएनपीए , नाव्हाशेवा पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर गायके, मोरा सागरी पोलिस ठाणेचे एस पी आय राहुल काटवानी, न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक सुर्वे,ऍड. सिद्धार्थ इंगळे,  महाराष्ट्र स्मॉल स्केल ट्रेडिशनल फिश वर्कर अध्यक्ष नंदकुमार पवार, युनियनचे जनरल सेक्रेटरी रमेश कोळी,परमानंद कोळी, नितीन कोळी, मंगेश कोळी, पाणी कमीटी अध्यक्ष उज्वला रमेश कोळी व  शेवा कोळीवाडा संक्रमण शिबिरातील ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध विषयावर सकारात्मक चर्चा झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top