नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

दसऱ्याला सोने लुटण्याची शेलघर गावाला शंभर वर्षांची परंपरा!


4k समाचार
उरण दि 4 (विठ्ठल ममताबादे )दसरा म्हणजेच विजयादशमी! हा वाईटावर चांगल्या विजयाचे प्रतीक म्हणून गणला जाणारा सण हिंदू धर्मात अतिशय पवित्र समजला जातो. अशा या दसऱ्याला पनवेल तालुक्यातील शेलघर गावात सोने लुटण्याची परंपरा सुमारे शंभर वर्षांची आहे. १९२५ म्हणजेच स्वातंत्र्यपूर्वकाळापासून शेलघरमध्ये उत्साहात दसरा साजरा करण्याची परंपरा नारायण देहू घरत यांनी सुरू केली. त्यांना त्याकाळी गांधीबाबा संबोधले जात असे ग्रामस्थ सांगतात. आत्माराम भगत, वाळकू भगत, वामन भगत, गणपत भगत हिरीरीने सहभागी होत. तीच परंपरा आजही तितक्याच उत्साहाने पाचवी पिढी दसरा साजरा करत आहे. 

एकेकाळी जंगलात असणाऱ्या शेलघर गावात पूर्वी शमीच्या (आपटा) वृक्षाखाली गावातील सर्व मंडळी एकत्र जमून सोने लुटत असत. आपल्यातील वैरभाव विसरून गुण्यागोविंदाने एक दुसऱ्याला शमीची (आपटा) पाने देऊन दसरा साजरा करत असत. त्यानंतर दसऱ्याची हीच परंपरा दिवंगत जनार्दन आत्माराम भगत, विठ्ठल गणपत भगत, तुकाराम नारायण घरत, काशिनाथ त्रिंबक भगत, जगन्नाथ वामन भगत, सुदाम कान्हा भगत यांच्या पुढाकाराने गावातील ग्रामस्थ एकत्र जमत असत आणि दसरा साजरा करीत. आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत, अरुणशेठ भगत, अमृत भगत, रमेश घरत, गुलाब घरत, मधुकर म्हात्रे, श्रीकांत घरत, रतनशेठ भगत आदी मंडळींच्या मार्गदर्शनाखाली शेलघरमधील तरुण पिढी एकत्र आली आणि गुरुवारी दसऱ्याला सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन शमीच्या झाडाची पूजा केली आणि एकमेकांना शमीची पाने देऊन उत्साहाने दसरा साजरा केला.तेव्हा ग्रामस्थांच्या आनंदाला उत्साहाचे भरते आले होते. जणू श्रीरामांनी रावणाचा आजच वध केला आहे.


आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत बहुतांश वेळा कामाच्या निमित्ताने जगभ्रमंती करीत असताना कितीही व्यस्त असले तरी प्रत्येक सणवार ग्रामस्थांसोबत साजरा करण्याची पद्धत त्यांनी आजही जोपसली आहे. आपले पाय जमिनीवर आहेत, हे त्यांच्या कृतीतून ते दाखवतात. ते एकेकाळी मुलांच्या शिक्षणाच्या निमित्ताने नाईलाजास्तव पनवेलला राहयचे; परंतु आपली गावापासून असलेली नाळ तुटू नये म्हणूनच गेल्या २० वर्षांपासून पुन्हा आपल्या शेलघर येथील ‘सुखकर्ता’ या निवासस्थानी राहातात. जेणेकरून गावातील सुख-दुःखात सहभागी होऊन सर्वांना अडीअडचणीत साथ देता येईल. त्यामुळेच दसऱ्याची शंभर वर्षांची परंपरा जपण्यासाठी त्यांनी  उत्साहाने ग्रामस्थांसोबत गुरुवारी दसरा साजरा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top