नवीन बातम्या
आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांचे आझाद मैदानात मुंडन आंदोलन
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाची दशकपुर्ती निमीत्त   रामदास आठवले यांचा भव्य नागरी सत्कार  
पनवेल महापालिकेच्या स्वतंत्र परिवहन सेवेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा तीव्र विरोध; ‘आधी पाणी, रस्ते आणि पार्किंगच्या समस्या सोडवा’
एसआयआर मोहिमेत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी न पोहोचल्याचा आरोप; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन
उलवेच्या समिक्षा मढवीची चमकदार कामगिरी;
रायगडमध्ये चौथा तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक
उलवे शहर मनसे तर्फे सत्कार.
सापडलेली तीन लाखांची बॅग प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन; महिलेचे साहित्य सुखरूप परत
कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याचा आढावा
गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पनवेल सनराईझचा शैक्षणिक मदतीचा हात
युवकांसाठी ‘व्हिजन भारत – जेन झी : संवाद ते संकल्प’ कार्यक्रम; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती

नशा मुक्तीबाबत जनजागृती रॅली



4k समाचार

उरण दि  4 (विठ्ठल ममताबादे )दिनांक ३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ ते १२:१५ वा.चे दरम्यान उरण पोलीस ठाणे व मोरा सागरी पोलीस ठाणे यांचे संयुक्तीक विदयमानाने उरण शहरामध्ये नशामुक्ती संदर्भात जनजागृती रॅली काढण्यात आली.या रॅलीत उरण एज्युकेशन सोसायटी, एन.आय.हायस्कुल व सिटीझन हायस्कुल चे विदयार्थी तसेच  हद्दीतील प्रतिष्ठित नागरीक व पोलीस पाटील सहभागी झाले होते.सदरची रॅली ही पेन्शन पार्क, (वैष्णवी हाॅटेल) उरण येथून सुरू होवून स्वामी विवेकानंद चौक, गांधी पुतळा मार्गाने, गणपती चौक, राजपाल नाका तेथून पालवी हाॅस्पीटल मार्गाने कामठा रोडने एन.आय.हासस्कुल याठिकाणी समाप्त करण्यात आली आहे.  

सदर ठिकाणी उपस्थित विदयार्थी व प्रतिष्ठित व्यक्तींना नशा मुक्ती संदर्भात पोलीस प्रशासनाच्या अधिकारी वर्गांतर्फे   मार्गदर्शन करण्यात आले. व्यसनमुक्ती समुपदेशक दर्शन नाईक यांनी देखील व्यसन हा आजार आहे, त्याचे कुटुंब व समाजावर होणारे परिणाम आणि पुनर्वसनाचा मार्ग याबाबत मार्गदर्शन केले.सदर जनजागृती रॅली मध्ये शाळेचे ८ शिक्षक, ३०० विदयार्थी,३५ प्रतिष्ठित नागरीक व १५ पोलीस पाटील यांचेसह ०३ पोलीस अधिकारी व ३५ पोलीस अंमलदार तसेच मोरा सागरी पोलीस ठाण्याचे  १ अधिकारी व १० पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला होता. सदर नशा मुक्ती रॅली शांततेत पार पडली.विविध व्यसनपासून तरुण पिढीने दूर राहावे, व्यसन, मादक पदार्थ नशेचे पदार्थ सेवन केल्याने होणारे दुष्परिणाम याबाबत समाजात जनजागृती व्हावी या अनुषंगाने नशामुक्ती रॅलीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनिफ मुलाणी यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top