नवीन बातम्या
आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांचे आझाद मैदानात मुंडन आंदोलन
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाची दशकपुर्ती निमीत्त   रामदास आठवले यांचा भव्य नागरी सत्कार  
पनवेल महापालिकेच्या स्वतंत्र परिवहन सेवेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा तीव्र विरोध; ‘आधी पाणी, रस्ते आणि पार्किंगच्या समस्या सोडवा’
एसआयआर मोहिमेत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी न पोहोचल्याचा आरोप; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन
उलवेच्या समिक्षा मढवीची चमकदार कामगिरी;
रायगडमध्ये चौथा तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक
उलवे शहर मनसे तर्फे सत्कार.
सापडलेली तीन लाखांची बॅग प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन; महिलेचे साहित्य सुखरूप परत
कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याचा आढावा
गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पनवेल सनराईझचा शैक्षणिक मदतीचा हात
युवकांसाठी ‘व्हिजन भारत – जेन झी : संवाद ते संकल्प’ कार्यक्रम; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती

श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान उरण विभाग तर्फे उरण मध्ये श्री दुर्गामाता दौड उत्साहात संपन्न.

4k समाचार

उरण दि 4 (विठ्ठल ममताबादे )शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेतर्फे प्रत्येक वर्षी नवरात्रोत्सवात स्त्री शक्तीचा जागर करण्यासाठी तसेच समाजात श्रीशिवछत्रपती धर्मवीर श्रीशंभुछत्रपती या पिता-पुत्रांच्या विचारांचा हिंदू समाज व्हावा असा आशिर्वाद श्री तुळजा भवानीच्या चरणी मागण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात गावो-गावी पहाटे ०६:०० वाजता श्री दुर्गामाता दौड चे आयोजन करण्यात येते. हया वर्षी उरण शहरात तीन दिवस श्री दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले होते. या श्री दुर्गा दौड मध्ये भाविक भक्त, शिवप्रेमी, विविध सामाजिक संस्था संघटनेचे प्रतिनिधी मोठया संख्येने सामील झाले होते.विजया दशमी अर्थात दसऱ्याच्या दिवशी या श्री दुर्गामाता दौड ची सांगता होते. 

नवीन संकल्प घेवून देव देश धर्माच्या रक्षणासाठी माता-माऊलींच्या संरक्षणासाठी सदैव कटिबद्ध राहू अशी आई तुळजा भवानी चरणी शपथ घेतली जाते.या राष्ट्र कार्यासाठी आम्हाला शिवछत्रपती धर्मवीर शंभूछत्रपती यांच्यासारखी शक्ती दे,बळ दे,शौर्य दे,धैर्य दे,धाडस दे असा आशिर्वाद आई तुळजा भवानी चरणी मागितला जातो.दसऱ्याच्या दिवशीच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा असलेला वार्षिक उपक्रम म्हणजे धारातीर्थ गडकोट मोहीम.या मोहिमेची घोषणा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक  भिडे गुरुजी करतात. यावर्षीची धारातीर्थ गडकोट मोहीम ही श्री लोहगड ते श्री भिमगड मार्गे राजमाची अशी असणार आहे. महाराष्ट्रासह देशभरातून लाखो धारकरी या गडकोट मोहिमेत सहभागी होत असतात आणि आपल्या मावळ्यांनी त्यावेळी जगलेलं आयुष्य अनुभवत असतात. 

सर्वांना आवाहन असेल की आपण या धारातीर्थ गडकोट मोहिमेत सहभागी होऊन आपल्या महाराजांनी आणि मावळ्यांनी जे जीवन जगलं आहे ते गडावर कसे राहिले असतील त्यांनी कशा मोहिमा केल्या असतील ते कुठ झोपले असतील त्यांनी कोणत पाणी पिल असेल याची अनुभूती घेण्यासाठी एकदा नक्की या गडकोट मोहिमेत सहभागी व्हा असे आवाहन श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान उरण विभाग तर्फे करण्यात आले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top