4k समाचार
पनवेल दि.4 (वार्ताहर): म्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी अभिवादन केले.
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने पनवेल येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले.

त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा तालुका पनवेल चे अध्यक्ष सुनील कांबळे यांच्या हस्ते महेश साळुंखे यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.. त्यावेळी पनवेल विधानसभा मतदार संघाचे पक्षाचे अध्यक्ष निलेश कांबळे त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्षाचे मागासवर्गीय सेलचे पनवेल तालुका अध्यक्ष सचिन कांबळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
