नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

माजी सैनिकाने तब्बल ३२ वर्षांनंतर वयाच्या ४८ व्या वर्षी आपल्या मुली सोबत दिली १२ ची परिक्षा आणि दोघांना मिळाले सारखेच गुण


पनवेल(प्रतिनिधी)किरण अर्जुन गोरे हे माजी सैनिक असून सध्या महसूल विभागात तहसीलदार कार्यालय पेण येथे महसूल सहाय्यक या पदावर कार्यरत आहेत. सन १९९३ साली १० वी पास झाल्यानंतर आय टी आय ला प्रवेश घेतला तीन वर्ष आय टी आय च प्रशिक्षण पूर्ण करून लगेचच सन १९९६ साली आर्मी मध्ये भरती झाले. आणि सन २०१३ साली १६ वर्ष  देशाची सेवा करुन आर्मी मधून रिटायर झाले. आणि नंतर महाराष्ट्र शासनाची सरळ सेवा विभागाची परीक्षा देऊन महसूल विभागात रुजू झाले. या दरम्यान त्यांचे १० वी नंतरचे पुढील शिक्षण घेणे राहुन गेले.


आपल अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपल्या १२ सायन्स मध्ये शिकत असलेल्या मुली सोबत परीक्षा द्यायची ठरवल आणि वावोशी हायस्कूल ता. खालापूर ह्या आपल्याच शाळेतून कला शाखेतून १७ नंबरचा (बाहेरून) फॉर्म भरून परीक्षा दिली. परीक्षेच्या वेळेस दिवस रात्र विधानसभा निवडणुकीचे काम आणि इतर सर्व जबाबदारी सांभाळुन जिद्दीने अभ्यास केला आणि परीक्षेत ७५% गुण मिळवून वावोशी हायस्कूल ता. खालापूर मध्ये शाळेत पहिला नंबर काढला.

एका माजी सैनिकाने वयाच्या ४८ व्या वर्षी घवघवीत यश मिळवून आपल अर्धवट राहिलेले   शिक्षण सुरू केल. तसेच त्यांच्या मुलीला सुद्धा सायन्स मध्ये ७५% गुण मिळाले आहेत. मुलगी आणि वडील दोघांनी सारखेच गुण मिळवून यश संपादन केल्यामुळे त्यांचे नातेवाईक आणि समाजामधे आणि महसूल प्रशासना मध्ये विशेष कौतुक केले जात आहे. ह्या मिळविल्या यशाबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन. ह्या यशामध्ये त्यांना शाळेचे शिक्षक कुटुंब, आणि मित्रांची चांगली साथ मिळाली अस त्यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top