नवीन बातम्या
7 Best WordPress MCP Servers and Plugins in 2026 (We Tested Them All)
How to Convert Images to WebP in WordPress (Free, No CDN)
Open Channels FM: The Core Principles of the Open Web, Simplified
Free WPVibe Alternative: Easy MCP AI vs WPVibe (Pricing, Limits, Reviews)
WordCamp Central: WordCamp Sylhet 2026: No Swag, All Heart
पनवेलमध्ये भाजपची सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांची संघटनात्मक बैठक संपन्न! ; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी पक्षकार्याचा आढावा; संघटनात्मक बळकटीकरणावर भर
डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्यासह मान्यवरांकडून भाजपचे प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांची सदिच्छा भेट!
विहिरी-बोअरवेलचे सर्वेक्षण, भूजल पुनर्भरण आणि प्रभागनिहाय जलसुरक्षा आराखडा तयार करण्यासाठी राजेंद्र शर्मा यांचे महापौर आणि आयुक्तांना निवेदन
हायकल कंपनीतील कामगारांना दरमहा २० हजारांची पगारवाढ; जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या करारामुळे विविध सुविधांचा लाभ!

लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये “ऋतू हिरवा” अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन



4kNews कामोठे दि. 2
पनवेल(प्रतिनिधी) लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त जाणीव एक सामाजिक संस्था पनवेल यांच्या वतीने “ऋतू हिरवा” या विशेष  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पावसाळ्याच्या विविध छटांचा अनुभव देणारा हा अनोखा सांस्कृतिक कार्यक्रम मंगळवार, दिनांक ४ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे संपन्न होणार आहे.


“फक्त पाऊसगाणी नाहीत तर पावसाच्या विविध २२ रूपांचा अनुभव देणारा” असा हा कार्यक्रम असून, रसिक प्रेक्षकांसाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमाची संकल्पना आणि निवेदन अनघा मोडक यांनी केले आहे.


 आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये संगीत, कविता, नाट्य आणि विविध कलाविष्कारांच्या माध्यमातून पावसाच्या विविध पैलूंना उजाळा देण्यात येणार आहे. जाणीव एक सामाजिक संस्था संस्थापक-अध्यक्ष तथा महापौर नितीन जयराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पनवेलमधील नागरिकांनी आणि कला रसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. मोफत प्रवेशिकासाठी महापौर नितीन जयराम पाटील जनसंपर्क कार्यालय- ९३२३२६६१६३, ८४५१८४२९१९, ९८२०६६६७६८, ९८१९६७६५१८, पनवेल भाजप मध्यवर्ती कार्यालय- ८०८०८२८१८२, अमोल स्टेशनरी, टिळक रोड – ९८२०२३३३४९ यांच्याशी संपर्क साधावा. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top