4k समाचार दि. 2
नवी मुंबई (प्रतिनिधी): नवीन पनवेल परिसरातील खिड्डुकपाडा येथे एका तरुण चालकाला लोखंडी टॉमी आणि दगडाने जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कळंबोलीतील ज्योती ट्रान्सपोर्टमध्ये काम करणाऱ्या मनोज कुमार शर्मा (वय २७) या चालकावर जय मंगल यादव व त्याचा भाऊ शिवमंगल यादव यांनी हल्ला केला. या प्रकरणी दोघांविरोधात नवीन पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना मंगळवारी रात्री घडली. माहितीप्रमाणे, चालक मनोज कुमार शर्मा रात्री सामान खरेदीसाठी गेला असता, परत येताना त्याने कंपनी मालक जय मंगल यादव यांच्याकडे सिगारेट मागितली. त्यावरून वाद निर्माण झाला आणि आरोपींनी त्याला लोखंडी टॉमी व दगडाने मारहाण केली. यामध्ये चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून अधिक तपास सुरू केला आहे. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
