4k समाचार दि. 5
केदार भगत मित्र परिवाराचा उपक्रम
पनवेल/प्रतिनिधी: संजय कदम पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी केलेल्या आवाहनानुसार विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत.पनवेल शहर भाजपचे उपाध्यक्ष केदार भगत आणि केदार भगत मित्र परिवार यांच्यावतीने ‘दादांचा शिधा’ याचे वाटप करण्यात आले.

यावेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर,जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील,माजी विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे,माजी शहर अध्यक्ष अनिल भगत, शहराध्यक्ष सुमित झुंजारराव,सरचिटणीस अमित ओझे,रुपेश नागवेकर, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे-समेळ,अजय बहिरा, शहर उपाध्यक्ष प्रितम म्हात्रे, पवन सोनी आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना परेश ठाकूर यांनी, आ.प्रशांत ठाकूर यांनी सामाजिक उपक्रम राबवण्याची संकल्पना मांडून कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले.त्यानुसारच पनवेल परिसरात आठवडाभर कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. कोरोना काळात भाजपच्यावतीने नागरिकांना मोफत अन्नदान करण्यात आले होते.तर राज्य शासनाने आनंदाची शिधा सुरू ठेवली.त्याच धर्तीवर केदार भगत यांनी आज लक्ष्मी वसाहतीमध्ये गरीब गरजूंना शिधा वाटप केले आहे. या कार्यक्रमाचा सर्वजण नक्कीच आदर्श घेतील असे ते म्हणाले.तर माजी शहराध्यक्ष अनिल भगत यांनी,केदार भगत हे वर्षभर सामाजिक उपक्रम राबवित असतात.

आ.प्रशांत ठाकूर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देवून सामाजिक उपक्रम राबविले जात असल्याने नागरिकांचे आशीर्वाद मिळत आहेत असे भगत म्हणाले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक केदार भगत यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रकांत मंजुळे,राजू कोळी,संतोष ढगे,रोशन जाधव, उमेश मंजुळे, मनीष निपाणीकर,अब्दुल पटेल,विकास मंजुळे, लखन जाधव, संतोष वर्तले, भावेश शिंदे आदींनी प्रयत्न केले.
