नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

पराभवाचे शल्य बाजूला ठेवून प्रितम म्हात्रे यांची कार्यक्रमाला हजेरी

साखरपुडा जमलेल्या जनसमुदायाने अनुभवला जिगरबाज नेता

कार्यकर्त्यांच्या
डोळयांच्या पाणवल्या कडा अजून विधानसभेचा गुलाल खाली बसला नाही तर  शेकापचे नेते उरण विधानसभे मध्ये लढत देत निसटता पराभव स्वीकारावा लागलेले नेते प्रितम म्हात्रे यांनी पनवेल तालुक्यातील तुराडे गावच्या ग्रामपंचायत सदस्य सौ.वाघमारे यांच्या मुलीच्या साखरपुडा कार्यक्रमाला उपस्थित राहून कालच निवडणूक निकाल लागुन पराभव झाला असला तरी तो खेळाडू वृत्तीने स्वीकारत आपण जिगरबाज आहोत हे दाखवून देत कार्यक्रमास उपस्थित राहिले

कार्यक्रमाच्या ठिकाणी गाडीमधून प्रितम म्हात्रे खाली उतरताच कार्यकर्त्यांनी गाडीला गराडा घालून आपल्या जिगरबाज नेत्याला अभिवादन केले. चेहऱयावर पराभवाचे सावट सुद्धा नव्हते. स्मितहास्य चेहरा पाहून कार्यकर्त्यांच्या डोळयांच्या कडा पाणवल्या.

विधानसभा निवडणुकीच्या निकालाला 24 तास सुद्धा झाले नसताना प्रितम म्हात्रे यांनी पायाला भिंगरी बांधून मतदार संघ पिंजायला सुरवात केली आहे. याची गोळा बेरीज त्यांना आगामी स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीत कामाला येणार आहेत. नेता हा जनसामान्य जनतेला आपला वाटणारा असावा याचे आज जमलेल्या जनतेने अनुभवले कार्यक्रमाच्या ठीकाणी असणारया जेवणासाठी प्रितम म्हात्रे पंगतीमध्ये जाऊन बसले. त्यांची ही कृती पाहून युवकांनी त्याचे फोटो काढून आपले स्टेटस ला ठेवले आहेत.

त्यांचा हा साधेपणा पाहून महिला वर्गामध्ये त्यांच्या साधेपणाची चर्चा चांगलीच रंगली. झालेला पराभव स्वीकारत मतदारसंघात पुन्हा भेटीगाठी  सुरू केलेले प्रितम म्हात्रे खऱ्या अर्थाने जननायक ठरले. उरण मतदारसंघात त्यांनी दोन नंबरची 88,878 मते मिळवत महाविकास आघाडीला तिसऱ्या क्रमांकावर ठेवले.

लोकसभेत केलेल्या कामाच्या बद्दल मोठेपणा दाखवत जर शिवसेनेने शेकापला उमेदवारी दिली असती तर आज 50,000 पेक्षा जास्त मतांच्या फरकाने प्रितम म्हात्रे विजयी झाले असते अशी चर्चा उपस्थितांमध्ये होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top