नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

द्रोणागिरी येथे आरोग्य सेवा केंद्र सुरू करा
शेकाप नेते प्रितम म्हात्रेंची मागणी”जेएनपीटी

(4kNews)

“शेकाप नेते प्रितम म्हात्रेंची मागणी”जेएनपीटी, दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ अशाप्रकारे मोठे उद्योग उरण परिसरात येत आहेत. तेथे येणाऱ्या रोजगारासाठी सुद्धा भारतातून वेगवेगळ्या ठिकाणाहून अनेक नागरिक या ठिकाणी स्थलांतरित होत आहेत. सिडकोच्या माध्यमातून पुष्पकनोड, उलवे, द्रोणागिरी येथे मोठ्या प्रमाणात शहराची निर्मिती करण्यात आली.

सिडकोने या ठिकाणी रस्ते, पाणी , वीज अशाप्रकारे सुविधा दिल्या आहेत परंतु तेथील वाढती लोकसंख्या पाहता आजही त्या अपुऱ्या आहेत.

आरोग्याच्या बाबतीत विचार केला असता 50,000 पेक्षा जास्त नागरिक आज द्रोणागिरी नोड मध्ये भारतातील विविध क्षेत्रातून नोकरी निमित्त येथे येऊन रहात आहेत. या ठिकाणी राहणारे नागरिक हे सिडकोच्या माध्यमातून मिळणाऱ्या आरोग्य सेवेच्या बाबतीत आजही वंचित आहेत

. या ठिकाणी आरोग्य सेवेसाठी आरक्षित असलेल्या ठिकाणी सिडकोच्या माध्यमातून आरोग्य सेवा केंद्र सुरू करावे जेणेकरून शासनाच्या सर्व आरोग्य सेवा आणि सुविधा तेथील नागरिकांना मिळतील. अशाप्रकारे मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी पत्राद्वारे सिडको प्रशासनाकडे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top