ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती

4kNews कामोठे
पनवेल, दि.६ (वार्ताहर) : ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती मान्यवरांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 


उलवे येथील दि.बा.पाटील भूमिपुत्र भवन येथे ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनचे उद्घाटन शिवसेना नेते उद्योगमंत्री उदय सामंत, रोजगार हमी खारभूमी मंत्री भरतशेठ गोगावले, युनियनचे अध्यक्ष व आ.महेंद्र थोरवे, मंगेश चिवटे, कुणाल सरवणकर, रायगड जिल्हाप्रमुख विनोद साबळे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मेघा दमडे, तालुका प्रमुख रघुनाथ पाटील, सरपंच सौ.अहिल्या बाळाराम नाईक, उपसरपंच मनोज दळवी, अंजली कांबळे, सुनंदा नाईक आदींच्या ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच उपाध्यक्ष पदी निलेश गायकवाड, सहसचिव स्वप्नील मोरे, सचिव महेंद्र नाईक आदींची नियुक्ती करून त्यांना नियुक्ती पत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top