4k समाचार दि. 25
पुणे सीएनजी वाहनधारकांवर वाढीव हायड्रो टेस्टिंग दरांचा मोठा आर्थिक बोजा पडला असून, यामुळे रिक्षाचालक आणि खासगी वाहनधारकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पूर्वी 500 ते 700 रुपयांमध्ये होणारी तपासणी आता तब्बल 2,800 ते 3,000 रुपयांपर्यंत वाढली आहे.

प्रत्येक तीन वर्षांनी ही तपासणी बंधनकारक असल्याने दरवाढ परवडणे कठीण ठरत आहे. यामुळे रिक्षा संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, तातडीने तोडगा न निघाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
