4k समाचार
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या “चलो मुंबई” च्या हाकेला विरोध करण्यासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर गेवराई येथे हाके यांच्या कार्यकर्ते आणि विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांमध्ये धुमश्चक्री उडाली.

या संघर्षादरम्यान लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

राज्यात आधीच आरक्षणाच्या मुद्यावरून वातावरण तापलेले असताना गेवराईतील या घटनेमुळे वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
