नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

नवीन पनवेलच्या उड्डाणपुलाला लागूनच असलेला अपघाताचा स्क्रीन फलक?

4k समाचार दि. 28
पनवेल   (वार्ताहर) : नवीन पनवेलच्या उड्डाणपुलाला लागूनच पनवेल महानगरपालिकेने लावलेला स्क्रीन बोर्ड (फलक) हा असलेला अपघाताचा फलक? होऊ शकतो, त्यामुळे या ठिकाणी स्क्रीन बोर्ड लावू नये अशी मागणी पनवेलकर नागरिकांकडून होत आहे.
नवीन पनवेलहून पनवेलकडे येणाऱ्या उड्डाणपूलावरुन (उतारावर) येत असताना डाव्या बाजूकडे उड्डाणपूलाला लागूनच असलेल्या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेने जाहिरातीचा जो स्क्रीन बोर्ड लावला आहे,तो बोर्ड अपघाताचा बोर्ड होऊ शकतो? 

या स्क्रीन बोर्डावर अजूनही जाहिराती सुरू केल्या नसल्यातरी उड्डाणपूलावरून पनवेलकडे येताना वाहन चालकांचे लक्ष या स्क्रीन बोर्डकडे जाणार,स्क्रीन बोर्डवरील जाहिराती आणि लख्ख प्रकाश वाहन चालकांचे लक्ष वेधणार, उड्डाणपूल आणि स्क्रीन बोर्ड यामध्ये कमी अंतर असल्याने,त्यात उतार,अशा वेळेस अपघात होण्याची शक्‍यता आहे. पनवेल महानगरात खड्ड्यांचे साम्राज्य असून त्याकडे प्रशासनाचे लक्ष नाही मात्र पनवेल महानगरपालिकेने जिथे जागा मिळेल तिथे स्क्रीन बोर्ड लावण्याचा धडका लावला आहे.परंतु हा स्क्रीन फलक लावू नये, कोणतीही अपघाताची दुर्घटना होऊ नये म्हणून,हा स्क्रीन बोर्ड लावू नये अशी नागरिकांची मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top