उरण दि २4 (विठ्ठल ममताबादे )कोंकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंमलबजावणी समिती यांच्या अंतर्गत प्रथम वर्ष वाणिज्य, कला, वाणिज्य (अकाउंटिंग व फायनान्स) ह्या विद्यार्थ्यांकरिता तसेच पालकांकरिता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम उपस्थितांचे परिचय व स्वागत प्रा. डॉ. ए. के. गायकवाड यांनी केले.

विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात नियमित उपस्थित रहाणे आवश्यक आहे. परंपरागत पदवी अभ्यासक्रमासोबत इतर कौशल्य विकास अभ्यासक्रम महाविद्यालयातील शिक्षणासोबत घेतले पाहिजे. तरच आपल्या पाल्याला रोजगार मिळेल. असे मनोगत माजी प्राचार्य किशोर शामा यांनी व्यक्त केले. जगाच्या शाश्वत विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण अत्यंत महत्त्वाचे आहे असे मनोगत विविध देशांच्या उदाहरणाद्वारे प्राचार्य डॉ. वाल्मिक गर्जे यांनी मांडले.नवीन शैक्षणिक धोरण २०२० मधील विविध उद्दिष्टे आणि प्रामुख्याने क्रेडिट स्ट्रक्चरच्या माध्यमातून आपली पदवी,पदव्युत्तर शिक्षण कसे पूर्ण करावे याचे मार्गदर्शन नवीन शैक्षणिक धोरण २०२० अंमलबजावणी समितीचे प्रमुख प्रा. डॉ. पी आर कारूळकर यांनी सांगितले.

नवीन शैक्षणिक धोरणामधील परीक्षेचे स्वरूप कसे आहे याबाबत मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांच्या नियमित उपस्थितीमुळे, वेळोवेळी महाविद्यालयाने पाठविलेले सूचनांचे पालन केल्यामुळे आपला पाल्य अधिक चांगली शैक्षणिक प्रगती करेल. असे परीक्षा विभाग प्रमुख डॉ. एम.जी.लोणे यांनी सांगितले. आजच्या बदलत्या सामाजिक घडामोडीमुळे पालक विद्यार्थी संवाद खूपच महत्त्वाचा आहे अशा प्रकारचे उद्गार महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य रमेश ठाकूर यांनी काढले. कार्यक्रमाचे आभार प्रा.डॉ.ए.आर.चव्हाण यांनी मानले.सदर कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयातील वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. व्हि. एस. इंदुलकर तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालक प्रा. डॉ. ए.के. गायकवाड , प्रा.आर.टी. ठवरे, डॉ. ए आर. कांबळे , डॉ. डी .पी हिंगमिरे, अकाउंटिंग अँड फायनान्स विभाग प्रमुख आर . पी. पठाण तसेच उपस्थित इतर सर्व प्राध्यापिका व प्राध्यापक, विद्यार्थी पालक यांच्या उपस्थितीने शिक्षक पालक विद्यार्थी सभा यशस्वी झाली.
