नवीन बातम्या
आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांचे आझाद मैदानात मुंडन आंदोलन
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाची दशकपुर्ती निमीत्त   रामदास आठवले यांचा भव्य नागरी सत्कार  
पनवेल महापालिकेच्या स्वतंत्र परिवहन सेवेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा तीव्र विरोध; ‘आधी पाणी, रस्ते आणि पार्किंगच्या समस्या सोडवा’
एसआयआर मोहिमेत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी न पोहोचल्याचा आरोप; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन
उलवेच्या समिक्षा मढवीची चमकदार कामगिरी;
रायगडमध्ये चौथा तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक
उलवे शहर मनसे तर्फे सत्कार.
सापडलेली तीन लाखांची बॅग प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन; महिलेचे साहित्य सुखरूप परत
कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याचा आढावा
गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पनवेल सनराईझचा शैक्षणिक मदतीचा हात
युवकांसाठी ‘व्हिजन भारत – जेन झी : संवाद ते संकल्प’ कार्यक्रम; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती

प्रकल्पग्रस्त विस्थापित मच्छीमारांचे पुनर्वसन डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करणार

   4K समाचार 
उरण दि 12 (विठ्ठल ममताबादे )
शेवा कोळीवाडा, उरण येथील सुमारे २५६ विस्थापित मच्छीमार कुटुंबांच्या पुनर्वसनाचा मुद्दा ऐरणीवर आला. शेवा कोळीवाडा पुनर्वसन संदर्भात याचिका माननीय मुंबई उच्च न्यायालयात महाराष्ट्र स्मॉल स्केल ट्रेडिशनल फिश वर्कर्स युनियन तर्फे दाखल करण्यात आली असून दिनांक ४/९/२०२५ रोजी मा. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे व मा. न्यायमूर्ती संदेश डी. पाटील यांच्यासमोर रिट याचिका ८६५५/२०२५ ची सुनावणी झाली.याचिकाकर्त्यांचे प्रतिनिधित्व अनुभवी प्रख्यात ऍड.रशीद खान व मानवाधिकार वकील व कार्यकर्ते ऍड.सिद्धार्थ सो.इंगळे यांनी केले.



याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की १९८६ सालीच विस्थापितांनी शासकीय मापदंडानुसार १७ हेक्टर क्षेत्रावर पुनर्वसन होईल या आश्वासनावर आपली जमीन जेएनपीए (जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी ) प्रशासनाला दिली होती.मात्र ४० वर्षे उलटून देखील आजतागायत त्यांचे पुनर्वसन झालेले नाही आणि ते अजूनही जे संक्रमण शिबिर सध्या राहण्यायोग्य नाही अश्या ठिकाणी दाटीवटीने राहत आहेत.



सुनावणीदरम्यान जेएनपीए प्रशासनाच्या वकिलांनी केंद्रीय मंत्रालयीन पातळीवर झालेल्या पत्रव्यवहार व प्रस्तावांची माहिती दिली. केंद्रीय शिपिंग व पोर्ट मंत्रालयाच्या वकिलांनी सांगितले की, प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून डिसेंबर २०२५ पर्यंत कॅबिनेटकडून अंतिम निर्णय घेतला जाईल. न्यायालयाने हे आश्वासन नोंदवून घेतले व पुढील सुनावणीसाठी २२ डिसेंबर २०२५ रोजी प्रकरण ठेवले आहे. 



याचिकाकर्त्यांचे वकील व मानवाधिकार कार्यकर्ते ऍड.सिद्धार्थ सो.इंगळे यांनी सांगितले की आम्ही न्यायालयात
आज एक ऍडिशनल ऍफिडेव्हिट सादर केले आहे ज्यामध्ये जेएनपीटी प्रशासन व केंद्रीय शिपिंग व पोर्ट मंत्रालयाचा खोटेपणा उघड होईल. सदरील ऍफिडेव्हिट मा.न्यायालयाने रेकॉर्ड वर घेतले असून जेएनपीटी प्रशासन व केंद्र सरकार हे माननीय न्यायालयाच्या आदेशाला बांधील आहेत. 



दरम्यान याचिकाकर्ते  नंदकुमार वामन पवार यांनी काही प्रसारमाध्यमांकडून स्थानिक राजकीय दबावाखाली शेवा कोळीवाडा पुनर्वसन संदर्भात खोट्या बातम्या पसरवून प्रकल्पग्रस्त विस्थापितांची दिशाभूल केली जात असल्याबाबत खेद व्यक्त केला आहे. तसेच अशा माध्यमांना अब्रूनुकसानीची कायदेशीर नोटीस देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही विनंती करीत आहोत की कृपया विस्थापित प्रस्थापितांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न करू नका, आम्हाला न्याय मिळवून देण्यामध्ये सहकार्य करा.असे आवाहन याचिकाकर्ते नंदकुमार पवार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top