4kNews कामोठे
उरण दि १२(विठ्ठल ममताबादे )
९ ऑगस्ट क्रांती दिन आणि जागतिक आदिवासी दिन म्हणून संपूर्ण भारतभर हा दिवस आदिवासी समाजाच्या वतीने राबवला जातो म्हणूनच उरण शहरांमध्ये उरण तालुका आदिवासी कातकरी आणि ठाकूर समाजाच्या वतीने हा दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला. उरण बस स्टॉप येथून नाचत गाजत भव्य रॅली सुरू होऊन महात्मा गांधी चौक येथे महापुरुष महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. विशेष म्हणजे या रॅलीमध्ये उरणच्या नगराध्यक्ष भावनाताई घाणेकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मिलिंद पाडगावकर यांचे उपस्थिती सुद्धा पाहायला मिळाले.शेवटी तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी नगरपालिका शाळा क्रमांक १ येथे रॅली आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, भगवान बिरसा मुंडा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि हुतात्मा नाग्या महादू कातकरी, राया ठाकर, त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

त्यानंतर आदिवासी महिलांच्या वतीने पारंपारिक आदिवासी नृत्य सादर करण्यात आले या कार्यक्रमाच्या वेळी १९० उरण विधानसभेचे माजी आमदार मनोहर शेठ भोईर, उरणच्या नगराध्यक्ष भावनाताई घाणेकर, पंचायत समितीचे सभापती महेश म्हात्रे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आदिवासी समाजाची सध्याची परिस्थिती आणि पूर्वीची परिस्थिती याची माहिती सांगितली आणि आदिवासी समाजाच्या प्रत्येक कार्यामध्ये सहभागी होऊन आदिवासी समाजाच्या विकासासाठी जातीने लक्ष घालू असे शब्द त्यांनी दिले,

आदिवासी समाजाच्या दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मिलिंद पाडगावकर,माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, परमानंद करंगुटकर, रायगड जिल्हा शिवसेना संघटक बी एन डाकी, माजी सभापती देवका वाघमारे, उरण पंचायत समिती सदस्य दीपक भोईर, नगरसेविका प्रार्थना म्हात्रे, गणेश सेवक, दत्तात्रय गोंधळी, नामदेव ठाकूर तसेच आदिवासी समाजातील अनेक गावातील पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष महेश कातकरी, उपाध्यक्ष सुरेश पारधी, कार्याध्यक्ष रोशन कातकरी, नारायण बरतोड, सचिव अजय कातकरी, सहसचिव मनीष कातकरी, खजिनदार नामदेव पारधी, सह खजिनदार पंढरी कातकरी, तसेच मधुकर पारधी, दशरथ कातकरी, अर्जुन कातकरी, गणेश कातकरी ( सातघर )सुनील नाईक, कमलाकर कातकरी,नामदेव बरतोड सर, गणेश कातकरी (जसाई )यांनी खूप मेहनत घेतली. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी समाजाच्या महिला, पुरुष आणि लहान मुल आणि मुली उपस्थित होते. शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कार्याध्यक्ष रोशन कातकरी यांनी केले आणि या संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन शिव संकल्प समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष, उरण तालुका युवक इंटकचे अध्यक्ष राजेंद्र भगत यांनी केले

