नवीन बातम्या
*राज्य व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकाराने फिरते लोकन्यायालय व कायदेविषयक जनजागृती शिबिर यशस्वीरीत्या संपन्न*
शिवसेना उरण विधानसभा पनवेल तालुका सभा संपन्न
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष नवीन पनवेल शहर शाखेच्या वतीने शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम संपन्न
हिंदु संस्कृती जपण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून शिवशक्ती मित्र मंडळामार्फत केले जात आहे ः रायगड भूषण रमेश गुडेकर
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी क्रांती स्तंभास अभिवादन
*पत्रकार संजय कदम यांना रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने देण्यात आला “शांतता आणि संघर्ष निवारण पुरस्कार*
सिडको ठेकेदारी सुरक्षा रक्षकांना रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये वर्ग करुन घ्या
हिन्द मजदूर किसान पंचायतचचे सामुहिंक आंदोलन
तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जप्त केलेल्या वाहनांचा होणार जाहीर लिलाव
*केएलई कॉलेजमध्ये राष्ट्रीय कायदा महोत्सव आणि आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन*

ज्याचा आम्ही महिनाभर प्रचार केला. मतदानाच्या दिवशी त्याच्यासाठी दिवसभर काम केलेत्याच उमेदवाराला आम्ही दुसऱ्या दिवशीं आम्ही सर्वांनी धु धु धुतला…

माझा जन्मच पश्चिम मुंबईतील बोरिवली-दहिसर येथील आंबावाडीत झाला आणि आणि तिथेच लहानचा मोठा झालो
आमचे ते वय म्हणजे नुकतेच बालपनातून तरुण पणात म्हणजे हाप चड्डी जाऊन फुल पॅन्ट मध्ये येत होतो तो काळ. तो काळ म्हणजे नुकताच कलर टीव्ही  आणि Dvd प्लेअर आला होता, भाड्याने कलर टीव्ही आणि DVD प्लेअर आणून रात्रीचे एकत्र 3/4 पिच्चर बघण्याचा तो काळ.  होळीला गणपतीला किंवा कोणाच्या लग्नला “मी हाय कोळी रंगानी गोरी” किंवा “हीच काय हो गोरी गोरी पोरी” या धम्माल गाण्याने कोणताही सण साजरा करण्याचा काळ, राजकीय भाषेत सांगायचं तर राजीव गांधी पंतप्रधान असण्याचा तो काळ.
आपल्या सोसायटीत कशी लहान मुळे आपल्याला होळीला, गणपतीला आणि दिवाळीच्या  5/50 रु वर्गणी मागतात तसे आम्ही  गणेश उत्सवात सर्व बच्चे कंपनी,  गणपती बसवू असे ठरवले त्या साठी सर्वांनी आपल्या परीने पैसेही जमा केले तरीही अजून वर्गणी हवी म्हणून आम्ही आमच्या आंबावाडीचे (दहिसर ) शिवसेना शाखा प्रमुख श्री विनोद घोसाळकर यांच्याकडे गेलो तेच विनोद घोसाळकर (ज्यांच्या आमदार मुलाचे गेल्यावर्षी  हत्या झाली होती.)

आताचे शिवसेना(उबाठा ) उपनेते श्री विनोद घोसाळकर, भारतीय जनता पार्टीचे नेते मी प्रवीण दरेकर आणि मी एकाच एरियातील म्हणेल तर एका गल्लीतील ते थोडे मोठे होते आणि आम्ही लहान.
त्यामुळे तेथे घडलेले राजकारण आणि वाढविवाद  सर्व आम्हाला माहित.

झाले असे कि गणपती साठी काही वर्गणी शिवसेना शाखा प्रमुख आम्हाला देईल म्हणून आशेने  शाखेत गेलो. परंतु  घोसाळकर ने वर्गणी द्यायची सोडून आम्हालाच दमाबाजी केली कशाला हे धंदे करता, आपला (शाखेचा ) गणपती बसतो त्यात काम करा वगैरे सुनवले, व आम्ही अपमानित होऊन परत आलो. नंतर आम्ही गणपती बसवला.

मला पेपर आणि पुस्तके वाचायचा खूप शोक  त्यामुळे मला जनरल नॉलेज  खूप होते  त्यामुळे ताज्या घडामोडी मला खूप महोत्सव होत्या, तीन महिन्यानंतर मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका लागल्या  सर्व कामाला लागले आमच्या साठी हीं पहिलीच निवडणूक होती. आमच्या गल्लीत एक आनंद शेट्टी नावाचा हुशार राजकीय व्यक्ती होता त्याने आमच्या टीम ला हेरले व आम्हाला प्रभावीत केले व आम्ही सर्व आनंद शेट्टी साठी प्रचार करू लागलो.
हीं गोस्ट शाखेत कळली तेंव्हा तिकडे चलबिचलं झाली आमच्या गल्लीतील इतर शिवसेना नेते आमची मनधरणी करू लागले, शाखेतून आम्हाला बोलवणे आले पण आमचा अपमान आम्ही विसरलो नाही
तसें आम्ही बाळासाहेबांचे कट्टर भक्त बाळासाहेबांचे भाषण ऐकायला आम्ही शाळेला दांडी मारून काखेत दप्तरं घेऊन कधी परळ, कधी दादर कधी गोरेगाव किंवा बोरिवली हमखास जायचो. इतके आम्ही बाळासाहेबांचे भक्त होतो.
तरीही आम्ही घोसाळकर ला साथ दिली नाही  कारण आम्ही स्वाभिमानी होतो, विशेषत अपमान विसरलो नव्हतो, आज जरी लोक  साहेबांचा आदेश हाच आमचा निर्णय म्हणतं आहेत. पण आम्ही आदेश पाळला नाही कारण आम्ही  आमचा स्वाभिमान जागृत ठेवला होता.

निवडणुकीची तयारी झाली व निवडणूक पूर्ण हीं झाली आणि विनोद घोसाळकर कमीत कमी  160 च्या आसपास मतांनी हरले तसेच. आमचा उमेदवार आनंद शेट्टी पण निवडणूक हरला. आणि जिंकला दुसराच जनता पार्टीचा  एक गुजराती उमेदवार  तो अगोदर हीं तिथून दोन वेळा निवडून आला होता म्हणजे त्याने या वेळेस हॅटट्रिक केली.

विनोद घोसाळकर 160 च्या मतांनी हरले  आणि आमच्या आनंद शेट्टीला 350 च्या आसपास मते मिळाली. त्यातील 200 तरी मते आमच्या मित्रमंडळी नी केलेल्या कामामुळे मिळाली  म्हणजे आम्ही जर घोसाळकर कडे असतो तर घोसाळकर सहज निवडून आले असते.
दोन्ही उमेदवार हरल्यामुळे दोन्ही बाजूला नाराजीचे वातावरण होते व शाखेतील लोक आमच्यावर नाराज होते. असेच काहीतरी वादावादी  झाली आणि आमच्यातील एकाला पोलीस पकडून घेऊन गेले.
त्या नंतर आम्ही आमचा उमेदवाराकडे गेलो व त्याला सोडवून आना सांगितले तर तो येण्यास टाळाटाळ करू लागला व नंतर सरळ नकार देऊ लागला. नीवडणुकीच्या दुसऱ्या दिवशीं  चौकात  चौकात  दिसला तेंव्हा तेंव्हा पोलिसांसमोर सर्वांनी त्याला लाथाबुक्क्यानी धु धु धुतला, मोठ्या हत्ती सारखा दिसणारा तो त्याला काही झाले कि नाही माहित नाही पण तो रिक्षात बसून पळून  गेला नंतर किती तरी दिवस दिसलाच नाही.

पुढे सहा महिन्याने जो नगरसेवक जिंकून आला होता त्याचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यामुळे तिथे परत पोट निवडणूक लागली व परत शिवसेना तर्फे विनोद घोसाळकर उभे राहिले. मागे जी आम्हाला नाराज करून चूक होती ती त्यांनी सुधारली व आम्हाला आदराने परत बोलवले.  व या वेळेस विनोद घोसाळकर भरघोस मतांनी जिंकले.
नंतर घोसाळकर अनेक वेळा नगरसेवक झाले आमदार झाले आमच्यातील एक (गजानन साळवी ) शाखप्रमुख झाला एक नगरसेवक झाला.(प्रकाश कारकर् जे नंतर स्वागवासी झाले.) सगळे आपण आपल्या उद्योगाला लागले आणि मी पत्रकार झालो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top