नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

आदर्श शिक्षक कै . गजानन खारपाटील गुरुजी यांची पाचवी पुण्यतिथी साजरी.

4kNews दि. 8
उरण.. मिलिंद खारपाटील
माऊली  महिला हरिपाठ मंडळ चिंचवली यांच्या हरिनामाचा गजर चिरनेर मध्ये घुमला!!
चिरनेर येथील आदर्श शिक्षक गजानन खारपाटील गुरुजींची पाचवी पुण्यतिथी चिरनेर येथील मातृपितृ छाया या त्यांच्या निवासस्थानी साजरी करण्यात आली. गजानन खारपाटील गुरुजी यांना रायगड जिल्हा परिषदेने १९८२ साली आदर्श शिक्षक आणि शिवभूमी शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. १९८३ साली उमरठ येथे सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मृतिदिनी झालेल्या वकृत्व स्पर्धेत  त्यांचा  रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला होता.अल्पबचत साठी त्यांना रायगड जिल्हा कलेक्टर यांनी सन्मानित केले होते. 


शालेय जीवनात सातवी मध्ये केंद्रात प्रथम, एस. एस. सी मध्ये उरण तालुक्यात प्रथम, डी एड ला रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला होता. त्यांच्या पत्नी सौ शारदा खारपाटील यांना रायगड जिल्हा परिषदेने १९९० साली आदर्श शिक्षिका म्हणून सन्मानित केले होते.
गुरुजींची तिन्ही मुले बी एस सी.. केमिस्ट्री आहेत.
त्यांना अभिवादन करण्यासाठी उद्योगपती पी पी खारपाटील, उद्योगपती राजाशेठ खारपाटील, कर्जत पंचायत समिती चे माजी सभापती तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य , काँग्रेस नेते अरविंद 

पाटील,सौ.मनिषा नितिन ठाकूर ( जिल्हानिहाय वक्ता  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आणि श्री. नितिन लक्ष्मण ठाकूर (सोशल मिडिया समन्वयक उरण विधानसभा ) चिरनेर ग्रामपंचायत चे माजी सरपंच पद्माकर फोफेरकर ,चिरनेर शिवसेनेचे माजी शाखाप्रमुख पद्माकर मोकल,चिरनेर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सचिन घबाडी, आदर्श शिक्षक संजय होळकर, , अर्थ व सांख्यकीय संचनालय मुंबई चे सेवानिवृत्त संशोधन अधिकारी काशिनाथ मोकल, उरण इंटक चे अध्यक्ष राजेंद्र भगत ,  नाट्य कलाकार संतोष ठाकूर,  गायनाचर्य वासुदेव पाटील, ,   चिरनेर हरिपाठ चे दत्ता मोकल, गोपाल  दुंगीकर, रमेश गोंधळी,भजनसम्राट हरिश्चंद्र बुवा गोंधळी, पत्रकार तृप्ती भोईर, रणीता ठाकूर , 

अनंत नारंगीकर, आगरी भूषण प्राध्यापक संदेश पाटील,सेवानिवृत मुख्याध्यापक ए डी पाटील सर,सेवानिवृत शिक्षिका माधवी म्हात्रे, कर्जत पंचायत समिती मधील जनार्दन पानमंद, पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते दिपक कदम,शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे शशांक ठाकूर,सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस इन्स्पेक्टर अशोक पाटील, रांजणपाडा.. चिंचपाडा ग्रामस्थ कमिटी चे उपाध्यक्ष प्रितेश फुंडेकर,उद्योजक गजेंद्र सिंह राजपुरोहित, सेकंडरी स्कूल चिरनेर दहावी १९८५ ग्रुपचे सुरेश केणी, सुभाष पाटील,निर्मला केणी, जेएनपीटी चे सेवानिवृत्त कामगार नरेंद्र ठाकूर, घनश्याम भोईर,
गुरुजींचे नातेवाईक, विद्यार्थी, खारपाटील परिवार, चिरनेर ग्रामस्थ आदी शेकडो जणांनी उपस्थित राहून गुरुजींना आदरांजली वाहिली.



यावेळी माऊली महिला हरिपाठ मंडळ चिंचवली यांचा सुश्राव्य हरिपाठ झाला. सर्वजण भक्तिरसात तल्लीन झाले होते. भक्तिरसात तल्लीन झालेल्या  हरीभक्तांना अक्षरशः खुर्चीस खिळवून ठेवले होते .प्रास्ताविकात मिलिंद खारपाटील यांनी सांगितले की वाचाल तर वाचाल हा गुरुजींचा संदेश होता
गुरुजींच्या स्मृतीप्रित्यर्थ आतापर्यंत पाच लाख रुपयांची पुस्तके अनेक शाळा आणि  वाचनालयांना दिली असून भविष्यात आणखी काही पुस्तके देण्याची घोषणा त्यांनी केली.



गुरुजींनी अनेक विद्यार्थी घडवले.  नाट्य दिग्दर्शन करून रायगड जिल्ह्यात अनेक नाट्य कलाकार निर्माण केले. त्यांचे अनेक विद्यार्थी स्कॉलर असून उच्चपदस्थ आहेत असे रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्री अरविंद पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले.पुण्यतिथी चे औचित्य साधून
कातळपाडा आणि  चिंचपाडा रांजणपाडा येथे चित्रकलेच्या वह्या आणि रंगीत खडू ,खाऊ यांचे वाटप करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top