पनवेल, दि.7 (संजय कदम) ः यामहा रे कंपनीच्या स्कुटीची डिलेव्हरी कोईंबत्तुर येथे न करता कुरिअरच्या वाढीव पेमेंटकरिता तसेच मालाच्या इन्शुरन्स करिता व गोडावूनचे भाडे वगैरे करता वेगवेगळ्या कारणाने पैसे मागणार्या डिलेव्हरी कंपनीविरोधात संबंधित गाडीच्या मालकाची फसवणूक करणार्या आरोपीस पनवेल शहर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे ताब्यात घेवून अटक केली आहे.

आर.रेवती यांच्या तक्रारीनुसार त्यांचे पती हे एम.महेशकुमार यांच्याकडे यामहा रे कंपनीची स्कुटी ही कुरिअरने पाठविण्याकरिता गुगलवर सर्च करीत असताना शिफ्टींग बाजार यांच्याकडून सुचविण्यात आलेल्या बाबा कार्गो पॅकर्स अॅण्ड मुव्हर्स ज्याचे मालक म्हणून काम पाहणारे नरेश शर्मा (प्रदीप शर्मा) मो.नं.7206811831 यांचे मोबाईलवर त्यांनी संपर्क केला असता त्यांनी पार्सल करीता दिलेल्या 25 हजार रुपये किंमतीची यामहा रे कंपनीच्या स्कुटीची डिलेव्हरी कोईंबत्तुर येथे न करता कुरिअरच्या वाढीव पेमेंट करता तसेच मालाचे इन्शुरन्स करीता व गोडावूनचे भाडे वगैरे अशा वेगवेगळ्या कारणाने त्यांच्या तसेच त्यांच्या पतीकडून 16650/- रुपये गुगल पे द्वारे पाठविण्यास सांगून आर.रेवती यांची या नरेंद्र शर्मा (प्रदीप शर्मा) व निरज पंडित मो.नं.7206635777 स्वतःचे नाव सांगणार्या इसमाने त्यांची फसवणूक केल्याबद्दल पनवेल शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली होती.

त्यानुसार वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कदम व त्यांच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे सदर आरोपीचा शोध घेतला असता आरोपी प्रदीप पवनकुमार शर्मा (36) हा तळोजा खुटारी परिसरात लपल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरोधात अटक कारवाई करण्यात आली आहे.
