4k समाचार
पनवेल, दि.8 (वार्ताहर) ः कामोठे वसाहतीमधील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून संताप व्यक्त करत महानगरपालिकेच्या अनागोंदी कारभाराचा निषेध करण्यासाठी कामोठ्याच्या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये रांगोळी काढून शिवसैनिकांनी अनोखे आंदोलन छेडले. त्यानंतर महापालिका अधिकार्यांची भेट घेवून त्वरित खड्डे बुजविण्याची मागणी करण्यात आली.

शिवसेना शहर कामोठे शहरप्रमुख रामदास गोवारी यांच्या मार्गदर्शनाखाली कामोठे विभागातील मानसरोवर स्टेशन पासून कामोठे सेक्टर -6 महामार्ग पर्यंत रस्ते दुरुस्तीचे काम चालू केले होते ते काम तुह्मी अपूर्ण अवस्थेत ठेवलं असून तिकडे खूप मोठ्या प्रमाणात खडे पडले आहेत आणि रोड वरचे डांबर निघून माती मध्ये रूपांतर झाले आहेत आणि मातीचा मोठ्या प्रमाणात धूर तयार होउन नागरिकांना श्वास घ्याचा त्रास होत आहे .

रोडवरच्या खड्यामुळे येणारे जाणारे वाहन त्या अडकून राहून वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर सिमेंटचे काँक्रेट करून रोड दुरुस्ती पूर्ण करावे. याकरिता आज कामोठे उपशहरप्रमुख सचिन मनोहर त्रिमुखे यांनी कार्यकारी अधिकारी दशरथ भंडारी पनवेल महानगर पालिका कामोठे इथे यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी महानगरप्रमुख अवचित राऊत, कामोठे शहरप्रमुख रामदास गोवारी, कामोठे शहरसंघटक संतोष गोळे, उपशहरप्रमुख गणेश खांडगे, दीपक पाटील,

उपविभागप्रमुख प्रशांत आनंदे, सचिन दाईंगडे, शहर संघटक संजय जंगम, मयुर सपकाळ, साहील जोशी, उपजिल्हा संघटीका सौ रेवती सपकाळ, उपतालुका संघटीका सौ मीना संजय सदरे, शहर संघटीका कामोठे सौ संगीता राऊत, उपहशहरप्रमुख सौ सुरेखा पंजाबराव जाधव, उपशहर संघटीका सौ स्मिता सुनील लागे, विभाग संघटीका सौ मीनाक्षी कैलास कांबळे, शाखा संघटीका सौ लीला बाळकृष्ण जामदार, सौ हर्षदा पाटील यांच्यासह महिला आघाडी युवासेना आणि शिवसैनिक पदाधिकारी आणि विविध सोसायटीचे सदस्य यावेळी उपस्थित होते. सदर काम लवकर न केल्यास 13/08/2025 रोजी एक दिवसीय लाक्षणीय उपोषण व आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला.
