4k समाचार दि. 10
पनवेल : रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल च्या सहयोगाने येवला येथील सुप्रसिद्ध सोनी “पैठणी चे प्रदर्शन व विक्री.
विविध अंगांनी व रंगाने नटलेल आपल पनवेल व त्यात वास्तव्य करणारी अठरा पगड जातीची माणसे. प्रत्येकाच्या मनात एकच ध्यास तो म्हणजे संस्कृती जपत पनवेलचा विकास. रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल गेली ३५ वर्ष समाजाकरीता आपुलकीने व जबाबदारीने आपली भूमिका बजावत अनेक लोकाभिमुख समाजोपयोगी उपक्रम पनवेल व आजूबाजूच्या परिसरात राबवले आहेत व त्याची दखल पनवेलकरांनी घेत नेहमीच आशीर्वाद दिला आहे व प्रशंसा केली आहे

.
कुठलाही उपक्रम राबवायचा तर त्यास निधीची आवश्यकता असते. मग काय? समाजाचे लोकाभिमुख उपक्रम राबवताना समाजातील लोकांच्या सहभागातून निधी उपलब्ध होईल असा उभा करायचा. त्या करिता असाच एक उपक्रम म्हणजे पैठणी प्रदर्शन. साडी त्यात “पैठणी” ही महाराष्ट्राची शान आहे आणि ती पारंपरिक वस्त्रापैकी एक मौल्यवान वस्त्र मानली जाते. “पैठणी” म्हटली की समस्त महिलांच्या मनातील हलवा कोपरा याचाच विचार करून रायगड, पनवेल, नवी मुंबई च्या महिलांच्या विनंतीपूर्वक मागणी नुसार रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल या क्लब ने येवला येथील 165 वर्षांची परंपरा असलेल्या “सोनी पैठणी प्रदर्शन व विक्री महोत्सव”

दि. १२,१३ व १४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत विरुपक्ष मंगल कार्यालय अशोक बागे समोर रत्नाकर खरे मार्ग, पनवेल येथे आयोजित करण्यात आला आहे.
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल ने गेल्या 35 वर्षांत डॉ. गिरीश गुणे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वैशिष्ट्य पूर्ण प्रकल्प यशस्वी केले आहेत.
- पर्यावरण पूरक गणेश विसर्जन वडाळे तलाव, रोटरी घनदाट जंगल प्रकल्प व
रोटरी बाल उद्यान - आदिवासी विभाग तील कोंबल टेकडी जल प्रकल्प
- अनेक शाळांना हॅपी स्कूल बनवणे
- अनेक शाळांना वॉटर प्युरिफायर,टॉयलेट ब्लॉक्स, मुलींकरिता सॅनिटरी नॅपकिन डिस्पोसबल मशीन बसवले. विद्यार्थ्यांना अभ्यास यशासाठी विविध ऍप्स उपलब्ध करून दिलेत, अनेक शाळांना दुरांत शिक्षणासाठी शिक्षण साहित्य उपलब्ध करून दिलेत.
- जनजागृती करीत अनेक प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले.
- डायलिसिस मशीन, व नविन जन्म झालेल्या बालकांसाठी वॉरमर ( Incubator)
- कॅन्सर पेशंट्स करिता केमोथेरपी सेंटर
- उपजिल्हा रुग्णालयात अनेक उपकरणे व औषधे उपलब्ध करून देण्यात आली.
- लवकरच माजी प्रांतपाल डॉ. गिरीश गुणे यांच्या संकल्पनेतून पनवेल मध्ये बटरफ्लाय गार्डन बनवणे हा प्रकल्प हाती घेणार आहोत.
चला तर मग स्वच्छ, सुंदर, सुरक्षित व सुशिक्षित, संस्कृतीने नटलेल्या पनवेल करिता, रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या संकल्पनेसाठी आपला सहभाग व हातभार लावण्यासाठी या पैठणी प्रदर्शन व विक्री महोत्सवास अवश्य भेट द्यावी अध्यक्ष अनिल ठकेकर सर व सारिका अनिल ठकेकर व क्लब सेक्रेटरी अतिश थोरात व पूजा अतिश थोरात व सर्व सभासद
