नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय वशेणी ता. उरण येथे गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप.



4k सामाचार
उरण दि १२(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील प्रा. जयदास पाटील शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमिक विद्यालय वशेणी येथे इयत्ता ५ वी ते १० वीच्या गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना सोमवार दि. ११ ऑगस्ट २०२५ रोजी  गणवेश वाटप करण्यात आले .स्व.संगीता मच्छिंद्र ठाकूर फाउंडेशन  धुतूम तर्फे माजी रा.जि .प .सदस्या कुंदाताई वैजनाथ ठाकूर आणि माजी रा.जि. प. सदस्य वैजनाथ मच्छिंद्र ठाकूर यांच्या सौजन्याने गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले 

.या कार्यक्रमा प्रसंगी ऍड .अविनाश ठाकूर उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत पिरकोन, प्रवीण राम ठाकूर पनवेल तालुका अध्यक्ष शिंदे गट, समाधान कृष्णा कटेकर अध्यक्ष धुतुम ग्रामस्थ मंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा गट,सागर ठाकूर समाजसेवक,गुरुनाथ तांडेल समाजसेवक, प्रा. जयदास पाटील संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील ,संस्थेचे सचिव राकेश पाटील तसेच महात्मा गांधी विद्यालय दिघोडेचे सेवानिवृत्त प्राचार्य नाथा नारायण नाईक उपस्थित होते.


   कार्यक्रमाच्या प्रारंभी पाहुण्यांच्या शुभहस्ते  हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे आणि सरस्वती मातेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान  वैजनाथ ठाकूर यांनी भूषविले.नाथा नाईक यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना आवाहन केले की त्यांनी विद्यालयाचा निकाल १०० % लावून विद्यालयाचे नाव तालुक्यात केले पाहिजे. प्रवीण ठाकूर यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनासाठी ११२ ताटं दिली.वैजनाथ ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितले की या विद्यालयाचा चेहरा मोहरा बदलायला हवा .

त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. त्यांनी संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव  यांना  विद्यालयाच्या विकासाबाबत आश्वस्त केले. विद्यालयाचे ग्रंथपाल विश्वनाथ केणी यांचे या कार्यक्रमासाठी मोलाचे योगदान लाभले.


कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे मुख्याध्यापक  प्रवीण पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top