नवीन बातम्या
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन
ठाकूर कुटुंबीयांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी बाप्पाची भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना

समाजसेवेच्या व्यापक उद्देशाने ‘केएमबी ग्लोबल ह्युमॅनिटी फाउंडेशन’ची स्थापना

4kNews कामोठे दि. 6
मुंबई : समाजातील गरजू, वंचित आणि दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी केएमबी ग्लोबल ह्युमॅनिटी फाउंडेशन या सामाजिक संस्थेची अधिकृत स्थापना करण्यात आली आहे. समाजहिताच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून सकारात्मक सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याचा संस्थेचा संकल्प आहे. 


संस्थेच्या माध्यमातून गरजूंना अन्नधान्याचे वाटप, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, मोफत आरोग्य तपासणी व आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, महिला सक्षमीकरण, वृद्धाश्रम व अनाथाश्रमांना सहाय्य, पर्यावरण संवर्धन, नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत तसेच विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.


समाजातील प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत मदतीचा हात पोहोचवणे, सामाजिक बांधिलकी जपणे आणि सर्वांना सोबत घेऊन समाजहिताची व्यापक चळवळ उभी करणे हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे संस्थापकांनी सांगितले.
या समाजोपयोगी कार्यात दानशूर व्यक्ती, स्वयंसेवक, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्था तसेच सर्वसामान्य नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून सहकार्य करावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
संपर्क :
केएमबी ग्लोबल ह्युमॅनिटी फाउंडेशन
ई-मेल : kmbfoundationindia@gmail.com
संकेतस्थळ : https://kmbhumanity.ऑर्ग.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top