नवीन बातम्या
ड्राइव्ह सेफ ३६०’ अभियानातून रस्ते सुरक्षेचा संदेश
रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ‘मराठी माझी देवालाही आवडे’ कार्यक्रम संपन्न
रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत संतगीतांचा सुरेल सोहळा; महापौर नितीन पाटील यांचा सन्मान
तरुणी बेपत्ता; पनवेल तालुका पोलिसांकडून शोध सुरू
विजय साबळे बेपत्ता; कामोठे पोलिसांत नोंद
शिवसेनेच्या मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
१.२२ कोटींचा मुद्देमाल मूळ मालकांना परत
सात पोलीस ठाण्यांतील ४८ गुन्ह्यांची उकल; १४० मोबाईल, दागिने, आठ वाहने आणि रोकड हस्तांतरित
क्रांती सम्राट’च्या संपादिका दिपालीताई पारसकर यांना ‘न्यायसखी पुरस्कार’ महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते कळंबोलीत सन्मान
पनवेलमध्ये ३० हजारांच्या पितळी समयांची चोरी; एकाला अटक
‘गावाच्या विकासासाठी ग्रंथालय उभारणे आवश्यक’
डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालयाच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन

कोकण मेळा सीझन ५ जानेवारीत भायखळ्यात


4kNews कामोठे दि 23
१६ व १७ जानेवारीला आयोजन; कोकणी संस्कृती, खाद्यपरंपरा आणि उद्योजकतेला मिळणार व्यासपीठ
मुंबई (अजित मोहिते) : कोकण कम्युनिटी फोरम वर्ल्ड कोकणी यांच्या वतीने ‘कोकण मेळा सीझन ५’चे आयोजन १६ व १७ जानेवारी २०२७ रोजी भायखळा येथील रिचर्डसन अँड कुडास ग्राउंडवर करण्यात येणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या मेळ्यात कोकणची संस्कृती, परंपरा, खाद्यसंस्कृती आणि सामाजिक एकतेचे दर्शन घडणार आहे.



या मेळ्याच्या माध्यमातून उद्योजक, महिला व्यावसायिक, नवउद्योजक, कलाकार आणि स्थानिक विक्रेत्यांना आपली उत्पादने, कला व कौशल्ये सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. पारंपरिक कोकणी खाद्यपदार्थ, सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनाचे उपक्रम आणि व्यावसायिक संपर्काच्या संधी ही मेळ्याची प्रमुख आकर्षणे असतील.



विविध समाजघटकांना एकत्र आणून सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मता वाढविणे, तसेच नव्या पिढीला कोकणच्या सांस्कृतिक वारशाशी जोडणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि युवकांना प्रोत्साहन देण्यासाठीही संस्था कार्यरत असल्याचे आयोजकांनी सांगितले. 



या मेळ्यात सहभागी होण्यासाठी नागरिक, उद्योजक, स्टॉलधारक, प्रायोजक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींनी सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. स्टॉल बुकिंग आणि सहभागाबाबतची अधिक माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.



कार्यक्रमाची माहिती
– कार्यक्रम : कोकण मेळा सीझन ५
– दिनांक : १६ व १७ जानेवारी २०२७
– स्थळ : रिचर्डसन अँड कुडास ग्राउंड, भायखळा, मुंबई
– आयोजक : कोकण कम्युनिटी फोरम वर्ल्ड कोकणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top