नवीन बातम्या
ड्राइव्ह सेफ ३६०’ अभियानातून रस्ते सुरक्षेचा संदेश
रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ‘मराठी माझी देवालाही आवडे’ कार्यक्रम संपन्न
रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत संतगीतांचा सुरेल सोहळा; महापौर नितीन पाटील यांचा सन्मान
तरुणी बेपत्ता; पनवेल तालुका पोलिसांकडून शोध सुरू
विजय साबळे बेपत्ता; कामोठे पोलिसांत नोंद
शिवसेनेच्या मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
१.२२ कोटींचा मुद्देमाल मूळ मालकांना परत
सात पोलीस ठाण्यांतील ४८ गुन्ह्यांची उकल; १४० मोबाईल, दागिने, आठ वाहने आणि रोकड हस्तांतरित
क्रांती सम्राट’च्या संपादिका दिपालीताई पारसकर यांना ‘न्यायसखी पुरस्कार’ महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते कळंबोलीत सन्मान
पनवेलमध्ये ३० हजारांच्या पितळी समयांची चोरी; एकाला अटक
‘गावाच्या विकासासाठी ग्रंथालय उभारणे आवश्यक’
डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालयाच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन

केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते ‘इंडिया केम २०२६’चे उद्घाटन

4kNews कामोठे दि. 23
रासायनिक उद्योगाच्या विकासासाठी जागतिक भागीदारी व गुंतवणुकीला चालना देण्यावर भर
मुंबई (अजित मोहिते) : केंद्रीय रसायने व खते तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते मुंबईत १४ व्या ‘इंडिया केम २०२६’चे उद्घाटन करण्यात आले. तीन दिवस चालणाऱ्या या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व परिषदेत उद्योग क्षेत्रातील प्रमुख नेते, धोरणकर्ते, गुंतवणूकदार आणि जागतिक भागधारक सहभागी झाले आहेत.



यावेळी नड्डा यांनी रासायनिक उद्योगाच्या विकासासाठी केंद्र सरकार अनुकूल वातावरण निर्माण करत असल्याचे सांगितले. ‘भाव्या रसायन’ योजनेमुळे या क्षेत्रात परिवर्तन घडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जागतिक स्तरावर स्पर्धात्मक रासायनिक उत्पादन केंद्रे विकसित करण्यासाठी बंदरे, रेल्वे, विमानतळ आणि रस्त्यांशी सक्षम संपर्कव्यवस्था तसेच एकात्मिक मूल्यसाखळी आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.



सन २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ घडविण्यात रासायनिक उद्योगाची भूमिका महत्त्वाची ठरणार असून, या क्षेत्रात देशांतर्गत उद्योग आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. ‘इंडिया केम २०२६’च्या माध्यमातून जागतिक भागीदारी, गुंतवणूक आणि शाश्वत विकासाला चालना मिळेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top