पनवेल दि. २२ 4k समाचार ( संजय कदम ) : पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये सुका कचरा आणि ओला कचरा गोळा करण्यासाठी वेगवेगळ्या गाड्या सुरु कराव्यात अशी मागणी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे शेकाप कामोठे कार्याध्यक्ष गौरव पोरवाल यांनी निवेदनाद्वारे केली आहे

यावेळी कार्याध्यक्ष गौरव पोरवाल यांच्यासह नितीन पगारे ,रमेश गोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते . यावेळी बोलताना कार्याध्यक्ष गौरव पोरवाल यांनी सांगितले की,आपल्या पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये सुका कचरा आणि ओला कचरा गोळा करण्यासाठी जोरदार मोहीम चालू आहे, परंतु त्याचा काही उपयोग होत नाही आहे, कारण कि तो कचरा (सुका आणि ओला) एकाच गाडी मध्ये एकत्र केला जातो.


त्यामुळे सुका कचरा आणि ओला कचरा दोन वेगवेगळ्या गाड्यांमध्ये घेऊन जायला हवा आणि कंपोस्ट बनविण्यासाठी प्रत्येकी १० सोसायटी मध्ये एका मशीन चे वाटप केले पाहिजे, ज्यामध्ये जनतेचा सहभाग या कामासाठी महानगर पालिकेला मिळू शकतो महानगरपालिकेला आमचा पाठिंबा नेहमीच असेल. महानगरपालिकेचे एक सकारात्मक पाऊल समाजाला स्वस्थ बनवू शकतो. तरी लवकरात लवकर ही सेवा सुरु करावी अशी मागणी केली आहे .
