नवीन बातम्या
उरण, रायगडचे सुपुत्र डॉ. मोहम्मद आमिर शेख यांना अभियांत्रिकी विषयात पीएच.डी.
नागाव ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी १२ कोटींहून अधिक गैरव्यवहाराचा संघर्ष समितीचा आरोप; २ सप्टेंबरला पंचायत समितीवर मोर्चाचा इशारा
खारघरमधील SIR प्रकरणाची व्याप्ती वाढली; पाच BLO निलंबित
प्रभाग १४ मध्ये आयुष्मान, आभा कार्ड शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
पुष्पकनगर परिसरात इसमाचा मृतदेह आढळला
*पर्यावरण संवर्धनासाठी नगरसेविका प्रीती जॉर्ज यांचा स्तुत्य उपक्रम* *महापौर नितीन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ५०० वृक्षांचे दान*
शिवसेनेनेतर्फे महापौर श्री.नितीन (भाई) पाटील ह्यांचा वाढदिवस उतसाहत साजरा!!
‘श्रावण क्वीन २०२६’ स्पर्धेत रियानका मालुसरे विजेत्या
पनवेलमध्ये महाराष्ट्रीयन पारंपरिक साजाचा उत्साह
देवद येथे पारंपरिक पद्धतीने नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी ; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग

‘श्रावण क्वीन २०२६’ स्पर्धेत रियानका मालुसरे विजेत्या
पनवेलमध्ये महाराष्ट्रीयन पारंपरिक साजाचा उत्साह

4kNews कामोठे दि. 30

रोटरी क्लब ऑफ पनवेल मिडटाउन , पनवेल महानगर व रोटरी क्लब ऑफ मानसरोवर , यांच्या संयुक्त विद्यमाने आणि साहस फौंडेशन च्या साहाय्याने “श्रावण क्वीन 2026” महाराष्ट्रीयन पारंपरिक साज…. ही स्पर्धा पनवेल येथील चंदू काका सराफ येथे आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाचे उदघाटन पनवेल मधील नगरसेविका आर्या प्रवीण जाधव, सौ रेश्मा भोईर , सौ माधवी म्हात्रे , संजीवनी मालवणकर, संयोगिता टेमघर, वृषाली पाटील, ज्योती पाटील , अल्का कोळी, रोटरी क्लब चे अध्यक्ष प्रशांत माने , भाग्यरथ गोस्वामी , संजय रोकडे व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत द्वीप प्रज्वल करून करण्यात आले.

रोटरी सहाय्यक प्रांतपाल रेश्मा कुरूप ह्यांनी माहिती दिली कि सौंदर्य स्पर्धांमध्ये व्यासपीठ उपलब्ध करून देऊन आम्ही एक संस्था म्हणून ह्या महिलांना सुद्धा व्यासपीठ देऊन त्यांचा मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केले आहे. या कार्यक्रमामुळे त्यांना स्पर्धा करण्याची आणि त्यांची प्रतिभा आणि टॅलेंट प्रदर्शित करण्याची संधी मिळाली.


एकूण 39 स्पर्धक ह्या स्पर्धा मध्ये भाग घेतले होते . श्रावण क्वीन 2026 ची सौंदर्यवती मिसेस विजेतेपद सौ रियानका मालुसरे , व उपविजेता स्वप्ना म्हात्रे व पल्लवी पाटील या ठरल्या. विजेत्यांना चंदू काका जेवेलर्स कडून सोन्याची नथ, क्राऊन , चांदीची फ्रेम, ट्रॉफी आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल मिडटाऊन तर्फे सर्टिफिकेट व इतर स्पर्धकांना सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले.


कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून अभिनेत्री स्वप्नाली केळजी होतया . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौं अनघा गोळें व कोरिओग्राफी साक्षी गायकवाड ह्यांनी केले त्याच बरोबर ह्या कार्यक्रमा मध्ये पनवेल येथील चंदू काका सराफ चे ब्रांच मॅनेजर अमेय जोशी फ्लोर मॅनेजर श्याम धनावडे व फ्लोर इन्चार्ज जान्हवी इंदुलकर व संतोष सुतार ह्यांचा विशेष सहकार्य होता .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top