पनवेल (प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोडमधील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलमध्ये पदवी प्रदान सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून शाळेचे चेअरमन परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

या वेळी विद्यार्थ्यांनी विविध कला सादर केल्या तसेच सीनियर केजीच्या विद्यार्थ्यांनी भाषण केले. त्यानंतर नर्सरी, ज्युनियर केजी व सीनियर केजीच्या विद्याध्यर्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. मग विद्याथ्यांनी वेशभूषा, फॅशन शो करून आपले कौशल्य सादर केले.

या कार्यक्रमाला ‘स्वत’च्या कौन्सिल सदस्य ज्योत्स्ना ठाकूर, वीर वूमन फाउंडेशनच्या अध्यक्षा अर्चना ठाकूर, मुख्याध्यापिका मुक्ता खटावकर, स्कूल कमिटी सदस्य निलेश खारकर, ज्योत्स्ना ठाकूर, धीरज उलवेकर, कविता खारकर यांच्यासह शिक्षक, पालक उपस्थित होते. या वेळी सीनिअर केजी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात आली.
