पनवेल(प्रतिनिधी) नवीन पनवेल मध्ये आधारकार्ड शिबीर आणि आदित्य बिरला आरोग्य विमा शिबीराचे 15 ते 22 मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले असून या शिबीराचे उद्घाटन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी झाले. यावेळी त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करुन नागरिकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर तथा भारतीय जनता पार्टीच्या उत्तर रायगड जिल्हा सरचटणीस चारुशीला घरत यांच्या सौजन्याने नवीन पनवेल सेक्टर 15 रेल्वे स्टेशन समोर आधारकार्ड शिबीर आणि आदित्य बिरला आरोग्य विमा शिबीराचे आयोजन करण्यात आले

आहे. या शिबीरात नवीन आधार कार्ड आणि आधार कार्ड मध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत. तसेच 18 ते 65 वर्ष वयोगटातील नागरीकांना अवघे 549 रुपये भरुन 10 लाख रुपयांचा आरोग्य विमा काढण्यात येणार आहे. या शिबीराच्या उद्घाटनावेळी माजी उपमहापौर चारुशीला घरत यांनी 15 ते 22 मार्च दरम्यान आयोजीत केलेल्या या शिबीराचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील,माजी नगराध्यक्ष संदीप पाटील,

जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, माजी नगरसेवक अजय बहीरा, माजी नगरसेविका अॅडव्होकेट वृषाली वाघमारे, युवानेते प्रतीक बहिरा, कामगार नेते रवी नाईक, कमलाकर घरत, जयराममुंबईकर किशोर मोरे, गुलाब थवई, सरोज मोरे, सुजाता पाटील, मेघा धमाल, प्रभा सिन्हा, प्रतीक पाटील, अर्चित घरत, इंडियन पोस्ट बँकचे मॅनेजर सिद्धार्थ मुखर्जी, कल्याणी कुंभार, संकेत कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
