नवीन बातम्या
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला
सज्ज आहेत माझे हात : अपोलो हॉस्पिटल्सच्या सीपीआर मोहिमेची विश्वविक्रम नोंद 30 दिवसांत 61,221 नागरिकांनी घेतली सीपीआर शिकण्याची शपथ
CREDAI MCHI YOUTH NMR कडून नवी मुंबई व रायगडमध्ये ‘Ease of Doing Redevelopment (EODR) 2.0’ची घोषणा
OpenStation Blog: WordPress Has Been Missing This for 15 Years
Open Channels FM: Open Source Champions
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट

सापडलेले मंगळसूत्र चिमुकल्याने केले परत..!



पनवेल प्रतिनिधी :-  रेल्वे पोलीस आयुक्तालयातील व पनवेल रेल्वे पोलीस ठाणे येथे कार्यरत असणारे पोलिस कर्मचारी सोमनाथ इंगवले यांचा मुलगा  नितेश सोमनाथ इंगवले हा कामोठे येथे क्लासला


जात असताना सेक्टर ३४ कामोठे  येथे त्याला एक पर्स मिळून आली त्या पर्समध्ये जवळपास अडीच तोळे सोन्याचे मंगळसूत्र होते, हे सोन्याचे दागिने पहिल्या नंतर, नितेश याने या पर्सची माहिती घरी वडील आणि आईला दिली, ही माहिती मिळाल्या नंतर हे दागिने स्वतः कडे न ठेवता , नितेश चे वडील सोमनाथ इंगवले आणि मुलगा नितेश यांनी जवळील कामोठे पोलिस ठाण्यात जाऊन सापडलेल्या दागिन्यांची माहिती कामोठे पोलिसांना दिली

आणि हे सोन्याचे मंगळसूत्र कामोठे पोलिसांच्या ताब्यात दिले, त्या नंतर कामोठे पोलिसानी मंगळसूत्र हरवलेल्या महिलेचा शोध लावला आणि महिलेची अधिक चौकशी तसेच खात्री करून ते सोन्याचे मंगळसूत्र त्या महिलेला परत केले. हे सोन्याचे मंगळसूत्र पाहून महिलेने नितेश इंगवले याचे आभार मानले, आणि  चांगले कार्यकेल्या बद्दल कामोठे पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी नितेश इंगवले याचे कौतुक करून त्याच्या कार्याचा सत्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top