नवीन बातम्या
*राज्य व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकाराने फिरते लोकन्यायालय व कायदेविषयक जनजागृती शिबिर यशस्वीरीत्या संपन्न*
शिवसेना उरण विधानसभा पनवेल तालुका सभा संपन्न
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष नवीन पनवेल शहर शाखेच्या वतीने शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम संपन्न
हिंदु संस्कृती जपण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून शिवशक्ती मित्र मंडळामार्फत केले जात आहे ः रायगड भूषण रमेश गुडेकर
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी क्रांती स्तंभास अभिवादन
*पत्रकार संजय कदम यांना रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने देण्यात आला “शांतता आणि संघर्ष निवारण पुरस्कार*
सिडको ठेकेदारी सुरक्षा रक्षकांना रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये वर्ग करुन घ्या
हिन्द मजदूर किसान पंचायतचचे सामुहिंक आंदोलन
तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जप्त केलेल्या वाहनांचा होणार जाहीर लिलाव
*केएलई कॉलेजमध्ये राष्ट्रीय कायदा महोत्सव आणि आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन*

रुग्णसेवा हीच जनसेवा मानून केलेले सेवा हे पूर्णत्वास नेते – आमदार प्रशांत ठाकूर


पनवेल दि. १३ (संजय कदम) : मानवता सेवा ही महत्त्वाची आहे. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयाचा आवाका वाढत चालला असून रुग्ण सेवा येथे चांगली मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात रुग्ण येथे उपचाराकरिता दाखल होत आहेत. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात असणारे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रम प्रसंगी केले.


पनवेल शहरातील डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात सुसज्ज नेत्र शस्त्रक्रियागृह, वातानुकूलित शवागृह , मॅमोग्राफी मशीन, आयुष उद्यान, केंद्रीय निर्जंतुकीकरण पुरवठा विभाग यांचे आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील, उपविभागीय अधिकारी पवन चांडक, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत, सार्वजनिक विभाग कार्यकारी अभियंता संजीवनी कट्टी, सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर सोमण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक शाकीर पटेल, माजी महापौर कविता चौतमोल, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेविका आरती नवघरे, माजी नगरसेवक राजू सोनी, माजी नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर निशिकांत पाटील, उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अशोक गीते, गौरव कांडपिळे यासह इतर अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.


या प्रसंगी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, रुग्णसेवा हीच जनसेवा मानून डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर काम करीत असतात आणि रुग्ण त्यातूनच पूर्ण बरे होत असतात ही जनसेवा बरच काही देऊन जाते त्यामुळेच आज उपजिल्हा रुग्णालयाची विश्वासहार्ता लोकांमध्ये वाढत चालली असून मोठ्या प्रमाणात रुग्ण येथे उपचार अर्थ येत असतात व रुग्ण बरे होऊन जातात त्याचाच मोठा आनंद होतो. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर सोमण यांनी सुद्धा त्यांच्या कंपनीच्या सीआर फंडाच्या माध्यमातून दहा लाखाची मोफत औषधे रुग्णांना उपलब्ध करून दिली आहेत. डॉक्टर गिरीश गुणे यांच्या रोटरी क्लबच्या माध्यमातून सुद्धा येथे मदत होते असते. माजी नगरसेवक राजू सोनी यांनी सुद्धा या ठिकाणी आयुश उद्यान स्वखर्चाने उभा करून दिला आहे. या सर्वांनीच सामाजिक भावनेतून केलेले कार्य हे कौतुकास्पद असल्याचं मत आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केले.


  तर याप्रसंगी बोलताना आमदार विक्रांत पाटील यांनी सांगितले कि, शासकीय रुग्णालयातील अपुऱ्या सुविधेमुळे नागरिक खाजगी रुग्णालयाकडे नाईलाजाने वळतात मात्र आता आपले उपजिल्हा रुग्णालयात सर्व सुविधांनी सुसज्ज झाले आहे. त्यामुळे या रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी नागरिकांसोबत संवाद साधून नागरिकांची मानसिकता बदलविण्याची गरज असल्याचे मत आमदार विक्रांत पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी बोलताना माजी महापौर कविता चौतमोल यांनी सांगितले कि, आमदार प्रशांत ठाकूर यांनी पहिल्यापासूनच या उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून रूग्णांना चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न केले. कोरोनाकाळात सुद्धा जास्तीत जास्त रुग्ण येथे दाखल झाले होते. व त्यांच्या चांगली सेवा झाली. आज या रुग्णालयाचे अत्याधुनिक रूप साकारले जात आहे यामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगितले. तर सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर सोमण यांनी सुद्धा या उपजिल्हा रूग्णालयाचे कौतुक करताना सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलला लाजवेल अश्या अत्याधुनिक सोयीसुविधा रुग्णांसाठी उपलब्ध झाल्याचे सांगितले. २५ मृतदेह ठेवण्यासाठी शवागृह, डायलिसिस सेंटर, डोळ्याची तपासणी आदी सेवेचा फायदा गरीब रूग्णांना होणार आहे. विस्टा फूडच्या माध्यमातून नेहमीच रुग्णालयाला मदत करत असतो. यंदाही त्यांच्या सीएसआर फंडातून १० लाखाची औषध दिल्याचे त्यांनी सांगितले. आता फक्त येथील सर्वच वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे रुग्णसेवा असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिभाऊ खरात यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top