पुणे (4K News)नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव दिले जाणार असून प्रकल्पग्रस्तांच्या भावनांचा केंद्र सरकार आदर करेल, असे ठोस आश्वासन केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री ना. मुरलीधर मोहोळ यांनी दिले.

पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण समितीच्या शिष्टमंडळाने रविवारी पुणे येथील सरितानगरी येथे आयोजित जनता दरबारात ना. मोहोळ यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, राज्य सरकारकडून पाठविलेल्या प्रस्तावाच्या आधारेच केंद्र सरकार निर्णय घेईल. भूमिपुत्रांच्या भावनांना न्याय मिळवून देणे हीच सरकारची भूमिका आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिष्टमंडळात ज्येष्ठ पत्रकार विजय कडू, सय्यद अकबर, विवेक पाटील, निलेश सोनावणे, रत्नाकर पाटील, संजय कदम, केवल महाडिक, गौरव जहागीरदार, राज भंडारी, प्रकाश म्हात्रे, विशाल रावसाहेब सावंत, अनिल कुरघोडे, रविंद्र गायकवाड, साबीर शेख, , गणपत वारगडा, सनिप कलोते, क्षितिज कडू, शंकर वायदंडे, सुभाष वाघपंजे, राम बोरीले, सुनील वारगडा, आशिष साबळे तसेच महिला सदस्य रुपाली शिंदे, दिपाली पारसकर, सुमेधा लिम्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
