नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

कामोठे सेक्टर २१ परिसरातील झालेली दुर्दशा; शेकाप कार्याध्यक्ष गौरव पोरवाल यांच्या हस्तक्षेपाने परिसर झाला स्वच्छ


पनवेल दि. १३ ( वार्ताहर ) :   कामोठे  वसाहतीमधील सेक्टर २१ परिसरातील झालेली दुर्दशा शेकाप कार्याध्यक्ष गौरव पोरवाल यांच्या लक्षात येताच त्यांनी तो परिसर स्वच्छ करून दिल्याने  परिसरातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत .  


  येथील सत्याम हाइट्स आणि महाकाली निवास सोसायटीच्या परिसरात अनेक वर्षांपासून रिकामे पडलेल्या एमएसबी प्लॉटमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा, झुडपे आणि रानगवत वाढल्यामुळे सापांचा उपद्रव प्रचंड वाढला होता. रहिवाशांनी हा गंभीर प्रश्न शेकाप कार्याध्यक्ष गौरव पोरवाल यांच्याकडे थेट मांडला. या तक्रारीनंतर शेतकरी कामगार पक्षाचे कार्याध्यक्ष गौरव पोरवाल यांनी तात्काळ पुढाकार घेत दोन दिवसांत एमएसबी आणि सिडको अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मात्र दोन्ही विभागांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलल्याने कोणतीही अधिकृत कारवाई झाली नाही. त्यावेळी   गौरव पोरवाल यांनी स्वतःच्या खर्चातून संपूर्ण प्लॉटची स्वच्छता करून घेतली, ज्यामुळे कचरा, झुडपे तसेच सापांचे संभाव्य ठिकाण असलेली सर्व घाण दूर करण्यात आली आणि संपूर्ण परिसर पुन्हा सुरक्षित बनला. स्थानिक रहिवाशांनी त्यांच्या या तत्पर आणि जबाबदार कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top