नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

आपले अस्तित्व कायम राखण्यासाठी लाईनआळीतील तिन्ही मंडळांनी हातात हात घालून कार्य केले पाहिजे – शिवसेना ज्येष्ठ सल्लागार रमेश गुडेकर


पनवेल दि. (13) वार्ताहर : यापुढे येणारी परिस्थिती अत्यंत कठीण होत जाणार असून पनवेलमध्ये स्थानिकांबरोबर मोठ्या प्रमाणात बाहेरील व्यक्ती व व्यापारी येथे येणार आहेत. त्यामुळे आपले अस्तित्व कायम राखण्यासाठी लाईनआळीतील तिन्ही मंडळांनी हातात हात घालून कार्य केले पाहिजे असे प्रतिपादन शिवसेना ज्येष्ठ सल्लागार रमेश गुडेकर यांनी लाईनआळीयेथील शिवाजी क्रीडा युवक मंडळाच्या महापूजा निमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना केले.  


यावेळी पनवेल महापालिकेच्या नगरसेविका दर्शन भोईर, दीपक शेट्ये, सुधीर सावंत, जतीन भेंडे, शिवराज साखरे, राजेंद्र साखरे, विकास म्हात्रे आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना रमेश गुडेकर यांनी सांगितले कि लाईनआळी येथील शिवशक्ती मित्र मंडळ,  शिवाजी क्रीडा युवक मंडळ व एकता मित्र मंडळ हि मंडळे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. हा विभाग माझा आहे. 

ह्या विभागाने मला बाप बनवले आहे. त्याला मी कधीही विसरणार नाही ह्या विभागातील कदम परिवार, चव्हाण परिवार, नरसाळे परिवार ह्या सर्व परिवारांनी मला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले. प्रत्येक संघर्षामध्ये त्यांनी माझे संरक्षण केल्याने मी त्यांचे जास्तीत जास्त देणे लागत आहे. व मी हे माझे कर्तव्य समजतो. त्यामुळे आपापसातील मतभेद विसरून सर्वानी एकत्र यावे असे आवाहन गुडेकर यांनी केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top