नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली उरण, माणगावच्या कार्यकर्त्यांचा कॉंग्रेसमध्ये पक्षप्रवेश!

4k समाचार
उरण दि 17  (विठ्ठल ममताबादे )”कॉंग्रेस हा विचारधारा असणारा पक्ष आहे. सर्वधर्म समभाव हा कॉंग्रेसचा पाया आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून कॉंग्रेसचा त्याग आहे. त्यामुळे जनतेला कॉंग्रेसचा इतिहास माहिती आहे. आज देशात जातीयवाद वाढला आहे, साहजिकच तेढ, द्वेष वाढला आहे. कॉंग्रेसला प्रेम भावना हवी आहे. त्यासाठी देशाचे नेते राहुल गांधी जनतेच्या भल्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत. मी स्वतः मानवतावाद मानतो आणि त्याच भावनेने सर्वांना मदत करतो. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने वाढले आहेत. कॉंग्रेसमध्ये सन्मान आहे, हे कार्यकर्त्यांच्या लक्षात आले आहे,” असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत उरण आणि माणगावच्या कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला त्यावेळी बोलत होते. 


शेलघर येथील ‘सुखकर्ता’ बंगल्यावर शुक्रवारी उरणचे शादाब शेख आणि माणगावचे सतीश टेंबे, तसेच अनेक कार्यकर्त्यांनी महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला. त्यांचे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी स्वागत केले.यावेळी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, अल्पसंख्यांक अध्यक्ष अखलाक शिलोत्री, उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, शहर अध्यक्ष गुफरान तुंगेकर,
उरण शहर महिला अध्यक्षा अफशा मुकरी,
उरण नगरपालिकेचे माजी नगरसेवक बबन कांबळे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top