नवीन बातम्या
सिडको–नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज , न्यू पनवेल (अधिकारप्रदत्तस्वायत्त)   महाविद्यालयातील कौशल्याधारीत उपक्रमांचे संपर्क अभियान

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी कृती समिती ठाम -लोकनेते रामशेठ ठाकूर
माथेरान नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता; भाजपच्या पनवेल कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार
बाल कविता संमेलनमध्ये सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई स्कुलच्या कु.काव्या सिंगची चमकदार कामगिरी
चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचा-यांच्या क्रिकेट संघास आंतरमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद
लोकनेते रामशेठ ठाकूर शाळांमध्ये आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण; २३ विद्यार्थ्यांचा गौरव
निलेश  सोनावणे सर्वांना न्याय देणारा सामाजिक कार्यकर्ता : लोकनेते  माजी खासदार रामशेठ ठाकूर  

उरणच्या इतिहासात प्रथमच उरण ते नवी मुंबई, उरण ते मुंबई बेस्ट अंतर्गत चलो बस सेवा सुरु.

4k समाचार
उरण दि 17 (विठ्ठल ममताबादे )उरण तालुका हा रायगड जिल्ह्यातील अतिशय महत्वाचा तालुका आहे. दळणा वळणाच्या दृष्टीने उरण तालुका आता विकसित होत चालला आहे. उरणला रेल्वे सेवा सुरु झाली रेल्वे मुळे हळू हळू कनेक्टीव्हीटी वाढत आहेत.नवी मुंबई आंतर राष्ट्रीय विमानतळ सुद्धा सुरु होणार आहे.त्यातच आता बेस्ट सेवेने भर टाकली आहे. उरण मधून मुंबई कुलाबा, नवी मुंबई जाण्यासाठी मुंबई महानगर पालिका परिवहन सेवेची बेस्ट सेवा सुरु करण्यात यावी अशी अनेक वर्षांपासूनची नागरिकांची मागणी होती. ती मागणी आता पूर्ण झाली आहे  नागरिकांनी उरण ते मुंबई , उरण ते नवी मुंबई बेस्ट बस सेवा सुरु होण्याचे स्वप्न बघितले होते. ते स्वप्न आता प्रत्यक्षात उतरले आहे. 

उरण मधील द्रोणागिरी सेक्टर १२ येथे भूपाळी गृह संकुल (सोसायटी )मध्ये राहणारे सामाजिक कार्यकर्ते तुषार उत्तम गायकवाड यांनी  उरण ते अटलसेतू मार्गा मुंबई या मार्गावर बेस्ट बस सेवा सुरु करण्यासाठी बेस्ट प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला होता. सतत पाठपुरावा सुरु ठेवला होता. तुषार उत्तम गायकवाड यांच्या प्रयत्नांना आता यश आले असून बेस्ट प्रशासनाने उरण ते बांद्रा स्टेशन पुर्व, उरण ते अटलसेतू मार्गा मुंबई कुलाबा, उरण ते वाशी अशी बस सेवा सुरु केल्याने प्रवाशी वर्गांनी, नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. उरणच्या इतिहासात पहिल्यांदाच उरण ते नवी मुंबई, उरण ते मुंबई अशी सेवा सुरु झाली आहे. नागरिकांनी, चाकरमानी विद्यार्थी प्रवाशी वर्गांनी याचे श्रेय सामाजिक कार्यकर्ते तुषार उत्तम गायकवाड यांना दिले आहे. शुक्रवार दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता भूपाळी गृह संकुल सोसायटी द्रोणागिरी सेक्टर १२ येथून  पहिली व दुसरी बस मुंबई व नवी मुंबई कडे रवाना झाल्या. बस सेवा सुरु झाल्या.यावेळी एकूण २ बस आल्या होत्या. 

या बसेसचे स्वागत सामाजिक कार्यकर्ते तुषार उत्तम गायकवाड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक संघ रजि. द्रोणागिरीचे अध्यक्ष नामदेव कुरणे, भूपाळी सोसायटीचे अध्यक्ष दिनेश पवार,भैरवी सोसायटी अध्यक्ष नवनाथ डोके,भूपाळी सोसायटी सेक्रेटरी लक्ष्मण मोटे,सामाजिक कार्यकर्ते तुकाराम खंडागळे, भूपाळी सोसायटी, भैरवी सोसायटी, मल्हार सोसायटी नागरिक, ग्रामस्थांनी केले. तर बेस्ट प्रशासनाच्या वतीने परिवहन सेवा चलो बस सेवेचे इन्स्पेक्टर भागवत कांबळे, इन्स्पेक्टर प्रमोद कोकरे उपस्थित होते. या बस सेवेचे उदघाटन सामाजिक कार्यकर्ते तुषार उत्तम गायकवाड यांनी नारळ फोडून व सर्वांना पेढे वाटून केले. या वेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे तुषार उत्तम गायकवाड यांनी स्वागत केले.आभार व्यक्त करताना तुषार उत्तम गायकवाड म्हणाले कि गेली अनेक वर्षांपासून उरण , द्रोणागिरी सिडको सोसायटी मधील नागरिकांना मुंबई व नवी मुंबई मध्ये प्रवास करताना अनेक अडचणी येत होत्या. 

त्यामुळे प्रवाशी वर्गांचे अडचणी कमी व्हाव्यात, प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये, त्यांना जलद व उत्तम सेवा मिळावी यासाठी माझे प्रयत्न चालू होते. बेस्ट प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार, पाठपुरावा सुरु होता. प्रवाशांची मागणी लक्षात घेता आता उरण मधून मुंबई, नवी मुंबई जाण्यासाठी बेस्ट प्रशासनाने बस सेवा सुरु केली आहे.बेस्ट बस सेवा सुरु केल्याने मी बेस्ट प्रशासनाचे आभार मानतो. तसेच उपस्थित सर्वांचे देखील आभार व्यक्त करतो. उरण व द्रोणागिरी परिसरातील नागरिकांनी या बेस्ट सेवेचा मोठया प्रमाणात लाभ घ्यावा. प्रवाशी वाढले तर अजून चांगली सेवा उरणच्या नागरिकांना मिळेल, सेवा सुरळीतपणे चालू राहिल. त्यामुळे बेस्ट बस सेवेचा नागरिकांनी मोठया प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन तुषार उत्तम गायकवाड यांनी केले आहे. यावेळी उपस्थित डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक द्रोणागिरी रजि. संघाचे अध्यक्ष नामदेव कुरणे यांनी देखील मनोगत व्यक्त करत चांगली सेवा उपलब्ध करून दिल्या बद्दल बेस्ट प्रशासन व तुषार उत्तम गायकवाड यांचे आभार मानले. उरणला महाराष्ट्र राज्य परिवहन सेवा महामंडळच्या बसेसच्या फेऱ्या कमी आहेत. 

शिवाय त्या फेऱ्या वेळेत नाहीत. नागरिकांना कुठेही वेळेत प्रवास करता येत नाही. तसेच रेल्वे सेवा फक्त नवी मुंबई पर्यंतच आहे. त्यामुळे दररोज चाकरमानी नोकरी धंदा निमित्त उरण ते मुंबई, मुंबई ते उरण या मार्गाने प्रवास करणाऱ्या शासकीय अधिकारी कर्मचारी, खाजगी कंपनीतील कर्मचारी अधिकारी, व्यापारी, उद्योजक यांना अनेक अडचणीना सामोरे जावे लागत होते. आता मात्र सध्या सिडको जेएनपीटी ते नवी मुंबई, सिडको जेएनपीटी ते मुंबई आणि सिडको जेएनपीटी ते ब्रांद्रा स्टेशन पुर्व असा प्रवास बेस्टच्या बसने करता येणार आहे. बस मार्गाचा नंबर चलो ऍप मध्ये दाखवत आहे. बेस्टने प्रीमियम चलो बस या मार्गावर सुरु केल्याने प्रवाशी वर्गांचे वेळेची बचत होणार आहे. या बेस्टच्या सेवेने नागरिकांना ऐसी मध्ये गारेगार थंड वातावरणात आरामदायी शांततेत प्रवास करता येणार आहे. उरणच्या इतिहासात पहिल्यांदाच ही सेवा सुरु झाल्याने नागरिकांनी, प्रवाशी वर्गांनी बेस्ट प्रशासनाचे व सामाजिक कार्यकर्ते तुषार उत्तम गायकवाड यांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top