नवीन बातम्या
केदार भगत यांच्यातर्फे दिवाळीनिमित्त सुवासिक उटण्याचे वाटप उटण्याच्या पाकिटांवर ‘पाणी वाचवा, जीवन वाचवा’चा संदेश; रामशेठ ठाकूर यांनी केले कौतुक
Open Channels FM: Web Summit Gender In Tech Report Reveals Gaps in Tech Leadership, Pay, and AI for Women
साईनाथ पवार यांना मानद डॉक्टरेट पदवीसह ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिव्यांग बांधवांच्या सेवेसाठी केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव; पुण्यात दोन्ही सन्मान प्रदान
अनंत गीते यांच्या हस्ते शिवसेनेच्या दिवाळी सुगंधी उटण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ  उपनेते बबनदादा पाटील यांच्यासह पदाधिकारी, महिला आघाडी व शिवसैनिकांची उपस्थिती
डेरवली जिल्हा परिषद शाळेत आकाशकंदील कार्यशाळा उत्साहात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; पर्यावरणपूरक दिवाळीचा दिला संदेश
दुकानदारांच्या समस्या आणि महागाईच्या प्रश्नावर संघटना आक्रमक
कोल्हापूरच्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पनवेलच्या शिवसैनिकाचा मदतीचा हात
राहुल गोगटे यांच्या पुढाकाराने २०० जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप
प्रशांत सोनवणे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त १०० महिलांना साड्यांचे वाटप ९ नोव्हेंबरला जुने पनवेल येथे आयोजन; आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा स्वाभिमानी पुरस्काराने सन्मान
अखिला मेमोरियल ट्रस्टतर्फे आदिवासी बांधवांना दिवाळी भेट

यू बिझनेस मिट यांच्यावतीने इंडो-थाई बिझनेस कॉरिडोर चे उद्घाटन
क्रॉस बाँड्री बिझनेस संधी प्राप्त करण्याकरिता आणखीन एक पाऊल

4kNews कामोठे दि. 6
प्रतिनिधी/ बेलापूर
यू बिझनेस मिट आणि संलग्न संस्थांच्या वतीने नुकतेच नवी मुंबई ग्लोबल समिट चे आयोजन करण्यात आले होते. या नावीन्यपूर्ण उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर यू बिझनेस मिट यांच्यावतीने  इंडो-थाई बिझनेस कॉरिडोर चे उद्घाटन सोमवार दिनांक ३ ऑगस्ट रोजी बेलापूर येथील बी आर एस सी सी एल येथे करण्यात आले. आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसाय संधी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने प्रारंभ करण्यात आलेल्या संकल्पनेने मूर्त रूप धारण केले असून हे उद्घाटन म्हणजे या संकल्पनेची पुढली पायरी मानली जात आहे..

    यू बिझनेस मिट चे संस्थापक वैभव सोनटक्के यांनी आपले सहकारी समृद्धी वाणी, पत्रकार विवेक पाटील, पत्रकार मंदार दोंदे आणि संलग्न संस्थांचे प्रमुख यांच्या उपस्थितीत इंडो-थाई बिझनेस कॉरिडोर ची निर्मिती केली आहे. एक्सपोर्ट इम्पोर्ट, मेडिकल टुरिझम, रिअल इस्टेट, ग्लोबल मिडिया, एंटरटेनमेंट इंडस्ट्री, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, क्लाऊड एंटरप्रेनरशिप, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बँकिंग अँड फायनान्स, कन्स्ट्रक्शन अशा नानाविध क्षेत्रातील होतकरू आणि विजिगीशू वृत्तीच्या व्यावसायिकांना थायलंड देशाबरोबर व्यवसाय करण्याकरता हे कॉरिडोर अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे असे वैभव सोनटक्के यांनी सांगितले.तसेच आगामी काळात मॉरिशस, दुबई आणि अमेरिका या देशांच्या समवेत क्रॉस बाउंड्री व्यवसाय करण्याकरता यू बिझनेस मीट पंख पसरणार असल्याचे त्यांनी सांगितले.


इंटरनॅशनल बिझनेस कॉरिडोरचे उद्घाटन करत असतानाच यु बिझनेस मीट यांच्यावतीने कॉर्पोरेट बिझनेस सेंटर देखील सुरू करण्यात आले आहे. व्यवसाय संधी शोधणाऱ्या होतकरूंना अल्प शुल्कात कार्यालय या उपक्रमांतर्गत उपलब्ध करून देण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय व्यवसाय करत असणाऱ्या होतकरूंना येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाताना लीगल ॲडव्हाइस, सरकारी परवाने, आंतरराष्ट्रीय व्यवसाय करार आदी महत्त्वपूर्ण दस्तावेज बनवण्याकरता यु बिझनेस मिटने पुढाकार घेतला आहे..


 या उद्घाटन सोहळ्याला निष्णात मानसोपचारतज्ञ आणि सेक्सोलॉजिस्ट डॉ राहुल भातांबरे,डॉ प्रियांका आशिष, सौंदर्य तज्ञ आणि फीजिओथेरपीस्ट,सेन्सिबल कनेक्ट सोल्युशन्स चे सर्वेसर्वा अमृत नेरळीकर,तेरणा हॉस्पिटलचे जनरल मॅनेजर डॉक्टर मनीष राय, यू बिझनेस मिट प्रतिनिधी केतकी पटवर्धन,जान्हवी पाटील,आय डी एफ सी बँकेचे पब्लिक रिलेशन्स आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स प्रतिनिधी.यांची प्रमुख उपस्थिती होती.


    थायलंड वरून पिटा मुख्य संचालक तथा थायलंड इंबसी ॲडव्हायझर प्रसर्त पियासाचादेश यांनी ऑनलाइन उपस्थित राहत उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. यु बिझनेस नीट च्या माध्यमातून भारत आणि थायलंड यांच्यातील व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची त्यांनी यावेळेस प्रशंसा केली. यु बिझनेस मिट च्या उपक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार,दैनिक महासागर संचालक तथा मुख्य संपादक श्रीकृष्ण चांडक , महाव्यवस्थापक रायगड दत्ता कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती होती.ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असणारे श्रीकृष्ण चांडक हे शुभेच्छा देण्यासाठी खास नागपूरहून नवी मुंबई येथे आले होते.


यू बिझनेस मिट चे संस्थापक वैभव सोनटक्के यांनी क्रॉस बाउंड्री बिझनेस ऑपॉर्च्युनिटी या विषयाबाबत उपस्थितांशी संवाद साधला. समृद्धी वाणी यांनी या संकल्पनेला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचे प्रसिद्धी माध्यमांना सांगितले तर पत्रकार मंदार दोंदे आणि पत्रकार विवेक पाटील यांच्या समन्वयाने पुढील आठवड्यामध्ये ग्लोबल जर्नलिझम या विषयाच्या अनुषंगाने थायलंड मधील शिष्टमंडळासोबत ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top