नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

परप्रांतीयांची फुटपाथ वरील अतिक्रमणे प्राधान्याने मोकळी करा – शिवसेनेची मागणी


पनवेल महापालिका क्षेत्रात सध्या अतिक्रमणांवर जोरदार हातोडा सुरू आहे. अनधिकृत बिना परवाना धारक अतिक्रमण आठवडे बाजार या सर्वांवर मोठ्या प्रमाणात तोडक कारवाई व जप्तीची कारवाई चालू आहे.

परंतु हे होत असताना महापालिका क्षेत्रातील कामोठा- खारघर – नवीन पनवेल खांदा कॉलनी व सर्वच परिसरात खाद्यपदार्थ व स्वीट्सची मोठी – मोठी परप्रांतीयांची दुकाने ज्यांनी फुटपाथ गिळंकृत करत फूटपाथचेही भाडे घेत अनेक स्टॉल बिना परवाना अनधिकृत रित्या उभे केले आहेत अशांवर मात्र कारवाई होताना दिसत नाही याबाबत नाराजी व्यक्त करत शिवसेनेचे पनवेल महानगर प्रमुख प्रथमेश सोमण यांच्या नेतृत्वात महानगर संघटक मंगेश रानवडे, कामोठे शहर प्रमुख सुनील गोवारी, महिला तालुकाप्रमुख मंदाताई जंगले तळोजा विभाग प्रमुख प्रकाश म्हात्रे यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली.

यावेळेस नावडे विभागात नव्याने विकसित झालेल्या इमारती त समोरील नाल्यांची न होणारी साफसफाई, कचरा इत्यादी विषय देखील शिवसेनेच्या माध्यमातून तेथील रहिवाशांच्या प्रतिनिधींनी आयुक्तांसमोर मांडले. तसेच आठवडा बाजार व अतिक्रमणांवर कारवाई करताना गरीब किंवा गरजू स्थानिक मराठी विक्रेत्यांपासून सुरुवात न करता फुटपाथ किंवा आसपासचा परिसर बेकायदेशीरपणे गिळंकृत करणाऱ्या परप्रांतीय व्यावसायिकांवर पहिले कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. आयुक्त मंगेश चितळे यांनी या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी चर्चेदरम्यान लवकरच खासदार श्रीरंग आप्पा बारणे व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत बैठक लावून सिडकोकडून मार्केट साठी विकसित करता येणारे भूखंड मिळवून घेणे व त्यावर स्थानिक मराठी उद्योजकांना परवाना देऊन व्यवसाय करण्याची संधी देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आवश्यक त्या हालचाली करण्याचे निश्चित झाले.

परंतु महापालिका प्रशासनाने कारवाईचे आश्वासन दिल्यानंतरही विशेषतः कामोठे विभागात या बड्या परप्रांतीय अनधिकृत उद्योगांवर कारवाई न झाल्यास शिवसेना त्यांच्याविरुद्ध रस्त्यावर उतरेल असे शहर प्रमुख सुनील गोवारी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top