नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

शिवसेना (उद्धव बाळा साहेब ठाकरे) पक्षाचा देवद पनवेल शाखा वर्धापन दिंन मोठ्या उत्साहत संपन्न


पनवेल दि.१४(वार्ताहर): पनवेल तालुक्यातील देवद पनवेल शिवसेना (उद्धव बाळा साहेब ठाकरे) शाखेचा चौथे वर्धापन मोठ्या उत्साहात संपन्न झाला
हा दिन म्हणजे मागील वर्ष भरातील कार्यक्रमतील आठवणींना उजाळा देण्याची संधी आणि पुन्हा जपण्याची मिळालेली संधी मागील वर्ष भरातील कार्यक्रम जागतिक महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी , तिथीनुसार शिव जयंती शोभा यात्रा मिरवणूक, दिवाळीत रांगोळी स्पर्धा व किल्ले बांधणी स्पर्धा, १० वी १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सत्कार समारंभ, गणेशोत्सवात आरास देखावे स्पर्धा, आषाढी एकादशीला तुलसी वाटप, नारळी पौर्णिमेला कोळी बांधावा सोबत मिरवणूक कादून नारळ नदीला अर्पण केला जातो. 

स्व.बाळासाहेब जयंती व स्मृति दिना निमित्त १०० जेष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा , मोफत वह्याचे वाटप, हे उपक्रम राबविले जातात. ग्रामपंचायत निवडणूक, लोकसभा व विधानसभा निवडणुकीत प्रचार करणे. बुथ वरील अनुभव घेता आला. संघटना वाढौसाठी प्रयत्न करणे. वर्षा भरातील कार्यक्रम यशस्वी रित्या पार करण्यासाठी सर्व महिला व पुरुष शिवसैनिकांच्या  सहकार्यामुळे यशस्वी करता आले.पुढील प्रगतीची वाटचाल करीत आहोत. वर्धापन दिनाचे औचित्य साधून उपविभाग प्रमुख जयंत पाखरे यांच्या वाढदिवस साजरा करण्यात आला.मां संपर्क प्रमुख अनिल चव्हाण साहेब, रायगड जिल्हा प्रमुख दिपक निकम, डॉ सेलचे राज्य उपाध्यक्ष डॉ.आशिष बांदेकर, विभाग प्रमुख विशाल भोईर, राज वाघमारे, हेमंत म्हात्रे,शाखा प्रमुख अर्जुन व्हटकर,सुरेश माने, हनुमंत खंडागळे,उपशाखा प्रमुख दिपक  दळवी, अँड. राम नाकती,राहुल केणी,विनोद कदम, ,  सचिन नाचक्की,संजय घाणेकर, सोलकर, नितीन शिंदे, तसेच महिला संघटीका पदाधिकारी , अनेक शिव सैनिक उपस्थित होते .मान्यवरांनी पुढील प्रगती भविष्यातील उद्दिष्टे व वाटचाली करिता शूभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top