नवीन बातम्या
आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांचे आझाद मैदानात मुंडन आंदोलन
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाची दशकपुर्ती निमीत्त   रामदास आठवले यांचा भव्य नागरी सत्कार  
पनवेल महापालिकेच्या स्वतंत्र परिवहन सेवेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा तीव्र विरोध; ‘आधी पाणी, रस्ते आणि पार्किंगच्या समस्या सोडवा’
एसआयआर मोहिमेत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी न पोहोचल्याचा आरोप; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन
उलवेच्या समिक्षा मढवीची चमकदार कामगिरी;
रायगडमध्ये चौथा तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक
उलवे शहर मनसे तर्फे सत्कार.
सापडलेली तीन लाखांची बॅग प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन; महिलेचे साहित्य सुखरूप परत
कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याचा आढावा
गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पनवेल सनराईझचा शैक्षणिक मदतीचा हात
युवकांसाठी ‘व्हिजन भारत – जेन झी : संवाद ते संकल्प’ कार्यक्रम; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती

*प्रितम म्हात्रे यांनी जपली सामाजिक बांधिलकी*
“नुकसानग्रस्त घरांसाठी जे.एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचा मदतीचा हात


       गेले काही दिवस रायगड जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर केला होता. यादरम्यान पनवेल उरण परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. ज्यामुळे सामान्य नागरिकांसोबत ग्रामीण भागातील शेतकरी सुद्धा हवालदिल झाला होता. 


   दोन दिवसांपूर्वी मुसळधार वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे उरण मधील सारडे गावात काही घरांची वाताहात झाली. घर आणि शेतामध्ये पाणी घुसले, काही घरांचे कौल आणि पत्रे सुद्धा सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उडून गेले. यासंदर्भात स्थानिक प्रशासनाकडून काही ठिकाणी पाहणी करण्यात आली.


  शासनाकडून योग्य तो पाठपुरावा करून त्यांना सहकार्य मिळेलच परंतु आपणही समाजाचे काही देणं लागतो या भावनेतून श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून मा.नगराध्यक्ष श्री जे एम म्हात्रे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एक माणुसकीचा हात म्हणून मा.नगरसेवक श्री.गणेश कडू, मा.सरपंच श्री जितेंद्र म्हात्रे, श्री रामेश्वर आंग्रे, श्री मंगेश अपराज  यांनी दुर्घटनाग्रस्त भागातील घरांची पाहणी केली.

दुर्घटनाग्रस्त रहिवासीयांची भेट घेऊन शासनाकडून योग्य तो मोबदला मिळवून देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू असे आश्वासन दिले. सामाजिक बांधिलकीतून जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून तातडीचे अर्थसहाय्य देऊन त्यांना मदत केली.
     यावेळी सारडे गावातील श्री.शेखर पाटील यांच्यासोबत ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top