नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

जागतिक तंबाखू नकार दिवस- २०२५





“जागतिक तंबाखू नकार  दिन” हा दरवर्षी ३१ मे रोजी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत संपूर्ण देशात पाळला जातो. भारतात दरवर्षी २ लाख ५० हजाराहून अधिक लोकांना तंबाखूमुळे कॅन्सर होतो. ४०% कॅन्सर हा तंबाखू सेवनामुळे होतो हे निष्पन्न झाले आहे. तोंडाच्या कॅन्सरचे सर्वाधिक रुग्ण भारतात आहेत. ८० % तोंडाचा कॅन्सर हा तंबाखूमुळे होतो.तंबाखूमुळे नाक, तोंड, स्वरयंत्र, गळा,अन्ननलिका, श्वसननलिका,फुप्फुस, मूत्राशय, मूत्रपिंड, पोट,गर्भाशय मुख इत्यादींचा कॅन्सर होतो.





तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ सेवन केल्याने होणारे शारीरिक दुष्परिणाम :-
केसांना दुर्गंधी येणे,डोळ्यांची जळजळ नजर कमजोर होणे, वास ओळखण्याच्या क्षमतेत बिघाड होणे, तोंडाला दुर्गंधी येणे, दात सडणे, हिरड्या कमजोर होणे,दात पडणे, शरीर कमजोर -अशक्त होणे, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे, पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या कमी होणे, स्त्रियांमध्ये मूल वेळेपूर्वी जन्माला येणे  वारंवार गर्भपात होणे, कॅन्सर, क्षयरोग, दमा, हृदयविकार, उच्च रक्तदाब, लकवा मधुमेह,गँगरीन इत्यादी आजार होणे.





निष्क्रिय धुम्रपान :-
तंबाखूच्या धुरात आणि धूम्रपानात निकोटीन,हायड्रोजन सायनाइड, नेप्तेलीन,
अमोनिया,आरसेनिक, ऍसिटोन,कार्बन मोनॉक्साईड,ब्युटेन यासारखी ४००० हून अधिक विषारी रसायने आढळतात.
असे असताना जेव्हा एखादी व्यक्ती धुम्रपान करते तेव्हा त्या व्यक्तीच्या शरीरात सुमारे ३०% तंबाखूचा धूर जातो तर सुमारे ७०% धूर हा वातावरणात सोडला जातो,धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या आजूबाजूच्या व्यक्ती हा वातावरणात सोडलेला धूर नकळत सेवन करतात यालाच निष्क्रिय धुम्रपान असे म्हणतात. खास करून मुलांमध्ये अप्रत्यक्ष धूम्रपानाने श्वसनाचे  आजार होतात. मुलांना खोकला,कानाचा संसर्ग इत्यादी रोगांना बळी पडावे लागते.




स्वमुख परीक्षा कशी कराल ?
आरशासमोर उभे राहून चेहरा व तोंड व्यवस्थित उघडून निरीक्षण करावे, तोंड मोठे उघडून दात व हिरड्यांचे निरीक्षण करावे,जिभेचा पृष्ठ भाग पहावा त्यामध्ये काही रंगात बदल,आकारात बदल किंवा एखाद्या भागाची झालेली वाढ यांचे निरीक्षण करावे.खालचा ओठ खाली व वरचा ओठ वर करून ओठांच्या आतील भागाची तपासणी करावी.कोठे जखम वगैरे आहे का? ते पाहावे गालाच्या आतील भागामध्ये कोठे लाल चट्टा (एरिथ्रोप्लकिया ),सफेद चट्टा (लुकोप्लाकिया)  आहे का? ते पाहावे.जे लोक जर्दा, गुटखा,पानमसाला खातात त्यांनी हाताची चार बोटे तोंडात टाकून तपासणी करावी.चार बोटे तोंडात न जाणे,जीभ पूर्णपणे बाहेर न निघणे, तोंडाच्या आतील त्वचेचा लवचिकपणा कमी होणे ही फायब्रोसिसची  लक्षणे असु शकतात.




तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी काही युक्त्या:-
१. आपल्या कुटुंबीयांसमोर, नातलगांसमोर आणि मित्रांसमोर तंबाखू सोडण्याच्या तारखेची घोषणा करा.
२. अशा जागा आणि लोकांपासून दूर राहा ज्या तुम्हाला तंबाखू सेवनासाठी प्रवृत्त करतील.
३. तंबाखू सेवनाची इच्छा झाल्यावर तंबाखू ऐवजी कुरमुरे, चणे, बडीशेप लवंग,वेलची चघळा.
४. आपले मन इतर कामात गुंतवा, आवडती गाणी ऐका,छंद जोपासा, योग प्राणायाम करा.
५. तंबाखू खाण्याची इच्छा झाल्यास थोडं थोडं पाणी पीत रहा.
६. आपल्या निश्चयाशी ठाम राहा, पुन्हा तंबाखू सेवन करून स्वतःला फसवू नका.
७. आपल्या प्रयत्नात यशस्वी झाल्यावर स्वतःलाच पारितोषिक द्या.



धूम्रपान टाळा- आरोग्य संभाळा
                                               
    लेखक – डॉ. संतोष प्रकाश झापकर
           दंतशल्यचिकित्सक
इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय उरण, रायगड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top