नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

प्रितम म्हात्रे यांनी जपली सामाजिक बांधिलकी
“नुकसानग्रस्त घरांसाठी जे.एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचा मदतीचा हात”



उरण दि ३०(विठ्ठल ममताबादे )रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून गेले काही दिवस रायगड जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर केला होता. यादरम्यान पनवेल उरण परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. ज्यामुळे सामान्य नागरिकांसोबत ग्रामीण भागातील शेतकरी सुद्धा हवालदिल झाला होता. 


   दोन दिवसांपूर्वी मुसळधार वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे उरण मधील सारडे गावात काही घरांची वाताहात झाली. घर आणि शेतामध्ये पाणी घुसले, काही घरांचे कौल आणि पत्रे सुद्धा सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उडून गेले. यासंदर्भात स्थानिक प्रशासनाकडून काही ठिकाणी पाहणी करण्यात आली.


    शासनाकडून योग्य तो पाठपुरावा करून त्यांना सहकार्य मिळेलच परंतु आपणही समाजाचे काही देणं लागतो या भावनेतून प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एक माणुसकीचा हात म्हणून नगरसेवक गणेश कडू, माजी सरपंच  जितेंद्र म्हात्रे, रामेश्वर आंग्रे,  मंगेश अपराज  यांनी दुर्घटनाग्रस्त भागातील घरांची पाहणी केली. दुर्घटनाग्रस्त रहिवासीयांची भेट घेऊन शासनाकडून योग्य तो मोबदला मिळवून देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू असे आश्वासन दिले.

सामाजिक बांधिलकीतून जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून तातडीचे अर्थसहाय्य देऊन त्यांना मदत केली.यावेळी सारडे गावातील शेखर पाटील यांच्यासोबत ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top